उदास असाल तर उदासीनता चरमस्थानी पाेहाेचू द्या

22 Jan 2026 22:36:13
 
 

sad 
 
आपण काही काळ सर्वांवरून ध्यान हटवण्याचा प्रयत्न करताे. पण यामुळे आपल्या मनात दडलेल्या चिंता दूर हाेत नाहीत. त्या जाेपर्यंत त्यांचे उपयुक्त उत्तर शाेधले जात नाही ताेपर्यंत त्या पुन्हापुन्हा परत येत राहतात. त्यामुळे याचे समाधान कसे केले जावे? एखादा त्रासाते, दुखावलेला असताना किंवा जेव्हा कधी आपण स्वत: त्रासात असताे तेव्हा त्यासाेबत कसे सहज राहू शकताे.सर्वप्रथम आपण ताे त्रास लवकर दूर व्हावा हा प्रयत्न साेडायला हवा आणि याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. आपण सहज व्हायला हवे. जेव्हा कधी आपल्याला अशांत करणारे काही जाणवते तेव्हा ते जाणवून घ्या. जर राग असेल तर स्वत:ला त्यामुळे पेटू द्या. त्रास हाेऊ द्या.
 
त्यामुळे जी उत्तेजना असते ती हाेऊ द्या. त्या भाावना तशाच हाेऊ द्या जशा त्या आहेत. त्यांचा आंतरिक आवाज ऐका. आपण एखाद्या गाेष्टीसाठी वेडावला आहात का? आपली ताकद काेठे निघून गेली आहे असे आपल्याला वाटते का? आपण कसे त्यांना बाहेर आणू शकता? या भावनांसाेबत काही काळ राहा.नंतर उशीत ताेंड लपवून वा एखाद्या एकांत जागी जिथे आपण रडून, किंचाळून वा काेणतीही शारीरिक क्रिया करून त्या भावनांपासून मुक्त हाेण्याचा प्रयत्न करा.जर उदास असाल तर उदासीनता चरमस्थानी पाेहाेचू द्या. जर डाेळ्यांत अश्रू आले असतील तर त्यांना बाहेरपडू द्या. जर आपल्याला वाटत असेल की आपण निरर्थक आहात तर ती भावना झटकू नका. ती जशी आहे तशीच राहू द्या.
 
आपण जेवढ्या या भावना जाणवाल तेवढ्या लवकर त्यातून बाहेर पडाल. जर आपल्याला अपराध्यासारखे वाटत असेल तर स्वत:ला विचारा की आपण यातून काय शिकलाे आहाेत? त्याच्या आधारे आपल्या प्रतिक्रिया व व्यवहार कसे बदलाल? जेव्हा आपण स्वत:ला क्षमा करायला शिकाल तेव्हा भूतकाळातून निघून वर्तमानात येण्यात यशस्वी व्हाल.वर्तमान ही अशी जागा आहे जिथे आपण बदल निर्माण करू शकता. तर का नाही आपण स्वत:ला वर्तमानात आणावे? जसा आपण आपल्या भावनांसाेबत सहज हाेण्याचा अभ्यास करू लागाल, इतरांच्या भावनांसाेबत हाेणेही तितकेच साेपे बनू लागते.स्वत:साेबत राहा ज्यामुळे आपण इतरांसाेबतही राहू शकाल. साेबतच असहजता थाेडी सहज करणे सुरू करा.
Powered By Sangraha 9.0