बाेरीवली-गाेराई प्रवास राे-राे जेट्टीमुळे अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण हाेणार

    22-Jan-2026
Total Views |
 
 

ro 
बाेरीवली व गाेराई दरम्यानचा जलप्रवास लवकरच अधिक वेगवान आणि सुलभ हाेणार आहे. सध्या या मार्गावर एक ते दीड तासाचा वेळ लागत असला तरी नव्या राे-राे जेट्टीमुळे हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण हाेणार आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले हाेते. आता जेट्टीच्या कामाला वेग मिळाला असून, प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. बाेरीवली ते गाेराई या मार्गावर राेजगार, दैनंदिन प्रवास आणि पर्यटनासाठी माेठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. दिवसभर फेऱ्या सुरू असतात आणि भाडे केवळ 10 ते 15 रुपये असल्याने गाेराई बीचवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा स्वस्त पर्याय ठरताे. मात्र, प्रवासासाठी लागणारा दीर्घ वेळ ही माेठी अडचण हाेती. ही अडचण दूर करण्यासाठी राे-राे फेरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जेट्टी सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि वाहनांसाठी अधिक जागा उपलब्ध हाेणार असून, पर्यटकांची संख्या वाढल्याने स्थानिक व्यवसाय आणि राेजगारालाही चालना मिळणार आहे. आपत्कालीन कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी स्वतंत्र बाेर्डिंग-डी बाेर्डिंग लाइन, कमी भाडे दर आणि नियमित प्रवाशांसाठी विशेष सवलतींची मागणी करण्यात आली आहे. या राे-राे फेरीतून प्रवाशांना वाहनांसह प्रवास करता येणार आहे.