महाराष्ट्रातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यातून मु्नत करण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पुढाकार घेत राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली हाेती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केंद्रीय जलश्नती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या संदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण केले. या प्राधिकरणास मंजुरी मिळाल्यास ते देशातील पहिले प्राधिकरण ठरणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.मुंडे यांनी राज्यातील जल आणि पर्यावरण प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली. नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्राच्या मदतीसाेबतच राज्याची स्वतःची स्वतंत्र यंत्रणा आणि नियाेजन असणे गरजेचे त्यांनी अधाेरेखित केले. देशातील अनेक नद्या विविधराज्यांतून प्रवाहित हाेतात. प्रत्येक राज्याने आपल्या सीमेतील नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी याेजनांची अंमलबजावणी केल्यास नद्या प्रदूषणमु्नत करण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकेल, असे त्यांनी सांगितले.या प्रस्तावावर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मार्गदर्शन केले. महाराष्ट्राने याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी विशेष काैतुक करून मदत करण्याचे आश्वासन दिले.