ओशाे - गीता-दर्शन

22 Jan 2026 22:22:32
 

Osho 
 
आयुष्य वाढेल ते फ्नत एका गाेष्टीमुळे आणि ती ही की, त्याचं शरीर आणि जमीन यांच्यात असलेल्या आकर्षणात जाे संघर्ष आहे ताे किमान हाेईल अन् त्यामुळे शरीर कमीतकमी जीर्ण हाेईल. तेव्हा जर कृष्ण असं म्हणताे की, फार उंच नाही फार खाेल नाही, अशी भूमी ध्यानासाठी निवडावी. तर त्याचीही कारणं आहेत.काेणी खड्ड्यांतही बसू शकताे. काेणी मचाण बांधून त्यावरही बसू शकताे. त्यात काय धाेका आहे? जर आपण खड्ड्यात बसलात, जमिनीच्या पातळीखाली बसलात तर दुसऱ्या नियमाकडे लक्ष द्यायला पाहिजे.
मी येथे बाेलताेय... हा माईक मी खाली करीन, हाताच्या पातळीवर आणीन तर माझा आवाज माईकवरून वरच्यावरच निघून जाईल. माझ्या ध्वनिलहरी त्याच्यावरून निघून जातील. हा माईक माझा आवाज नीट पकडू शकणार नाही.
 
हा माईक मी थाेडा वर केला तरी माझ्या ध्वनिलहरी त्याच्याखालून निघून जातील.हा माईक त्यांना पकडू शकणार नाही. जेव्हा ताे माईक बराेबर मला समांतर असेल, आवाजाच्या लहरींच्या समांतर असेल तेव्हाच माईक माझ्या ध्वनिलहरी नीट ग्रहण करू शकेल. माईक माझ्या ओठांच्या जितका समांतर असेल तितका माझा ध्वनी पकडणं साेपं जाईल.अगणित प्रकारचे तरंग नेहमीच या साऱ्या पृथ्वीवर सतत वाहत असतात. चहूकडे अगणित तरंग पसरत असतात. हे तरंग निरनिराळ्या प्रभारांचे असतात.अन् माेठी आश्चर्याची गाेष्ट ही की एखादा विचार जितका वाईट तितके त्याचे तरंग प्रभारी, वजनाने जड असतात, विचार जितका शुभ तितके ते तरंग हलके, निर्भार.
Powered By Sangraha 9.0