अयाेध्या आणि दिवाळी एकमेकांचे समानार्थी शब्द

    22-Jan-2026
Total Views |
 
 

diwali 
 
अयाेध्या आणि दिवाळी हे आता एकमेकांचे समानार्थी शब्द झाले आहेत. जेव्हा भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयाेध्येहून परत आले हाेते तेव्हा अवधपुरी सजवली हाेती. अयाेध्येतील लाेक दिवे लावून प्रभूचे स्वागत करत हाेते.भगवानांच्या अयाेध्येत परतण्याच्या स्मरणार्थ शतकानुशतके त्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते.नव्याने बांधलेल्या मंदिराच्या उद्घाटनानंतर, अयाेध्येत दरवर्षी दिवाळीला नवीन विक्रम केले जातात. अयाेध्येत दिवाळीच्या दिवशी शरयू नदीच्या 56 घाटांवर 26,17,215 दिवे लावण्यात आले हाेते. दिव्यांच्या सजावटीत 32 हजार स्वयंसेवक सहभागी झाले. प्रज्वलित केलेल्या दिव्यांची संख्या गिनीज बुकमध्ये नाेंदली गेली.यापूर्वी अयाेध्येतच 25 लाख दिव्यांची नाेंद हाेती, जी माेडली गेली. 2128 विद्वान आणि पंडितांनी वैदिक मंत्रांनी शरयू नदीची पूजा केली.हा देखील एक जागतिक विक्रम हाेता. गाेस्वामी तुलसीदासजी रामचरित मानसमध्ये लिहितात की, शहराचे साैंदर्य वर्णन करता येत नाही. शहराबाहेरही खूप विलाेभानीय दृश्ये दिसतात. दिवाळीच्या दिवशी अयाेध्येतही असेच दृश्ये निर्माण हाेतात.