महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पाॅवर हाऊस : मुख्यमंत्री

22 Jan 2026 22:47:02
 
 

davos 
भारतातील उद्याेग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेट वे-ऑफ-इंडिया असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे 14 लाख 50 हजार काेटींचे गुंतवणूक करार येथे पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीसाेबतच राज्यात 15 लाख राेजगाराच्या संधी निर्माण हाेणार आहेत.राज्य शासनाच्या उद्याेग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रांतील उद्याेगांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री, उद्याेग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. हरित ऊर्जा, अन्नप्रक्रिया, पाेलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्ससह ईव्ही-ऑटाेमाेबाइल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध ेत्रांतील ही गुंतवणूक मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिराेली, अहिल्यानगर या भागात पाेहाेचणार असल्याने तेथे उद्याेग वाढीसह माेठ्या प्रमाणात राेजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे.
 
तत्पूर्वी येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.उद्याेजक, गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता यंदा गतवर्षीहूअधिक गुंतवणूक आणि राेजगार संधींचे करार हाेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.आगामी दाेन दिवसांत एआय, क्वांटम कंम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसह फिनटेक, लाॅजिस्टिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर; तसेच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्याेग घटकांशीही करार हाेणार आहेत. त्या दृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू करण्यात आली आहे.कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे स्वागत केले. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. काेकाकाेलाचे सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट मायकेल गाेल्टझमन यांच्यासमवेतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
Powered By Sangraha 9.0