अमेझाॅन इंडिया आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-काॅमर्स कंपन्यांच्या सुरू असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या सेलमध्ये 20 ते 22 ट्न्नयांनी वाढ हाेण्याची शक्यता आहे. 16 जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल 2025च्या या उत्सवाच्या हंगामात असलेल्या ऑनलाइन खरेदीचा वाढता उत्साह दाखवताे.प्रजासत्ताक दिनानिमित्तचा सेल हा ऑनलाइन किरकाेळ विक्रेत्यांसाठी वार्षिक विक्रीची सुरुवात करून देताे.यानंतर उन्हाळी सेल, मान्सून सेल आणि सप्टेंबरच्या आसपास सुरू हाेणाऱ्या मुख्य सणासुदीच्या हंगामाचा काळ येताे. महिनाभर चालणाऱ्या सणासुदीच्या सेलच्या तुलनेत आताचा कालावधी कमी असताे. तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या मते, सणासुदीच्या हंगामातील सेल हे ‘मागणीवर’ आधारित असतात, तर प्रजासत्ताक दिन सेल प्रामुख्याने ‘सवलतींवर’ आधारित असताे. कंपन्या इलेक्ट्राॅनिक्स, फॅशन, साैंदर्य प्रसाधने आणि घरगुती उपकरणांचा आपला जुना साठा संपवण्यासाठी या काळात सवलती देतात.
‘प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सेलने आता ई-काॅमर्स कॅलेंडरमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले आहे,’ असे एका उद्याेजकाने सांगितले. इलेक्ट्राॅनिक वस्तूआणि माेबाइलमुळे विक्रीला माेठी गती मिळत आहे. फॅशन आणि साैंदर्य प्रसाधने यांसारख्या उत्पादकांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लॅटिसचे आशिष धीर यांनी सांगितले.डेटम इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, सणासुदीच्या काळात ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर 1.24 लाख काेटी रुपयांची एकूण विक्री झाली हाेती. कंपनीचे सतीश मीना म्हणाले की, ‘या काळात काेणतेही सण नसल्याने माेठ्या विक्रीची अपेक्षा नसते, परंतु सवलतींमुळे खरेदी वाढते.प्रजासत्ताक दिनानिमित्त सेल इव्हेंट मुख्यत्वे जुना साठा कमी करण्यासाठी असतात, त्यामुळे ब्रँड्स या काळात नवीन उत्पादने लाँच करत नाहीत.
’ फ्लिपकार्टच्या प्रव्नत्याने सांगितले की, ‘सेलला जाेरदार सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या पहिल्या तीन दिवसांत विक्रीमध्ये वार्षिक स्तरावर पाहता 35 ट्न्नयांनी वाढ नाेंदवण्यात आली आहे, जे ग्राहकांचा प्रचंड उत्साह दर्शवते.सणासुदीच्या हंगामानंतरही ग्राहकांची खर्च करण्याची तयारी कायम आहे.दिवाळीनंतरच्या मंदीऐवजी मागणीत सातत्य दिसून येत आहे. ‘लिबास’ या भारतीय फॅशन ब्रँडने 17 ते 18 जानेवारीच्या वीकेंडला सामान्य दिवसांच्या तुलनेत 10 ते 15% जास्त विक्री नाेंदवली. किचन अप्लायन्सेस स्टार्टअप ‘बियाँड अप्लायन्सेस’ने गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 पटीने वाढ नाेंदवली आहे.अमेझाॅन संस्थापक के. विकास यांच्या मते, ही वाढ केवळ जुन्या साठ्यावर दिलेल्या सवलतींमुळे नसून, नवीन लाँच आणि ताज्या साठ्यामुळे झाली आहे.