आज विचारांची देवाण घेवाण, आपल्या बुद्धीचा विकास हे सारं काही वाचेच्या माध्यमातून शक्य झाले आहे. आपल्या वाणीत मधुरता हवी. आपली वाणी ओजस्वी असावी. उत्तम बाेलण्याची कला आत्मसात केल्यास जीवनाला खरा अर्थ प्राप्त हाेताे.त्यासाठी नित्यनेमाने वाचन आवश्यक आहे. राेजच्या पाठांतरामुळे मेंदू तल्लख राहताे. त्यासाठी चांगले उच्चार व अचूकतेसाठी वाचन केले पाहिजे. आज माणसाच्या परिचयाची सुरुवात ही चेहऱ्यावरून हाेत असली तरी वाणी, विचार, आणि कर्तृत्वावरूनच संपूर्ण ओळख हाेत असते.
चांगल्या आचार विचारातून आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढते. आपण काय बाेलताे, कसे बाेलताे याचा सारासार विचार करून आत्मविश्वासपूर्वक बाेलावे. आत्मविश्वास ही माेठी ताकद असून आत्मविश्वासाने बाेलता येणे खूप महत्त्वाचे आहे.माणसाने बाेलता येण्याची कला आत्मसात केली पाहिजे.
आयुष्यात बाेलता येण्याची कला ही फार महत्त्वाची आहे. जेवढे आपण जास्त बाेलू तेवढाच आपला आत्मविश्वास देखील वाढत असताे. त्यासाठी जीवनात बाेलण्याची सवय लावून घेता आली पाहिजे. आत्मविश्वास वाढविण्यासाठी बाेलणे ही सवय अत्यंत उपयुक्त आहे. आज स्पर्धेच्या युगात काेणीही मागे राहता कामा नये. जीवनात सर्व काही बदलता येऊ शकते. फक्त आत्मविश्वास पाहिजे. आणि हा आत्मविश्वास बाेलण्याने वाढताे. यशाला गवसणी घालायची असेल तर बाेलता आलेच पाहिजे.आज प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. ते आपण ओळखले पाहिजे. जसे आपण जीवनाला आकार देऊ त्याप्रमाणे आपण घडत असताे. अनेकदा बाेलताना भीती वाटते. बाेलू की नकाे अशी मनात शंका येते. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आधी मनातील भीती दूर केली पाहिजे. जेवढे जास्त बाेलू तेवढाच आपला आत्मविशवास वाढत असताे. तेव्हा बाेलणे हे खूप महत्त्वाचे आहे. बाेलण्यानेच वाढताे आत्मविश्वास हे कायम लक्षात ठेवावे.
-संताेष दत्तू शिंदे, काष्टी, ता. श्रीगाेंदा जिल्हा अहिल्यानगर माे. 7721045845