प्रत्येक माणसाच्या मनात अनेक भावना असतात. त्यापैकीच भीती अशी भावना आहे जी आपल्या व्यक्तिमत्त्वाला अत्यंत प्रभावित करते. भीतीची 2 मुख्य कारणे असतात. एक वास्तविक कारण तर दुसरे काल्पनिक कारण.वास्तविक कारणांमध्ये स्वत: व इतरांनी अनुभवलेली भती येते व काल्पनिक कारणात अंधविश्वासजन्य भीती असते. वास्तविक भीतीत काही भीती अशा असतात ज्यांचे काेणतेही निदान नसते पण ज्या भयांचे निदान श्नय आहे त्यामुळेही माणूस विशेषत: महिला उगाचच भयभीत हाेतात.तशी तर भीतीची जाणीव काेणत्या ना काेणत्या टप्प्यावर प्रत्येक प्राण्याला असते, पण महिला पुरुषांच्या तुलनेत काहीशा जास्तचघाबरतात. ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास पूर्ण हाेऊ शकत नाही. कधकधी जादा भीती मानसिक राेगाचेही रूप घेते.
जंगली प्राण्यांना पाहून भीती वाटणे स्वाभाविक असते पण काही महिला तर उंदीर वा मांजरीलाही घाबरू लागतात.ज्या याचे सूचक असते की आपली भीती मानसिक राेगात बदलत आहे.काही महिला विमान वा जहाजातून प्रवास करायला घाबरतात तर काही लिफ्टमधून जाण्यासही घाबरतात.एकाकीपणाची भीतीही एक सामान्य भीती आहे. या भीतीत भयभीत व्यक्ती सतत इतरांसाेबत राहू इच्छिते.भाेजनसमारंभाचे निमंत्रण मिळाल्यानंतरही एकटी जात नाही.लाेकांना भेटण्याची भीतीही सामान्य आहे. याचे राेगी एखाद्याच्या नजरेला नजर द्यायलाही घाबरतात. राेगाची भीतीही काही महिलांमध्ये जास्त असते. विशेषत: एखाद्या विशिष्ट राेगाच्या विचारानेच त्या भयभीत हाेत असतात.
काही महिला बंद रूममध्येही भयभीत हाेतात. त्या एसीरूममध्येही एकट्या राहू शकत नाहीत. बंद रूमप्रमाणेच माेकळ्या जागेची भीतीही एक मानसशास्त्रीय राेग आहे. याची शिकार बहुधा ग्रामीण महिला हाेत असतात. अशा महिला आपला बराचसा वेळ चार भिंतीत घालवत असतात अशावेळी बाजारात वा एखाद्या घरगुती कार्यक्रमातील गर्दीलाही घाबरतात.काही महिलांना अंधाराची भीती वाटते तर काहींना तीव्र प्रकाशामुळे झाेप येत नाही. उंच ठिकाणाची भीतीही महिलांमध्ये भरपूर आढळते. या भीतीमुळे अशा महिला विमानप्रवासही करायला घाबरतात. तसेच पाण्याचीही भीती कमीजास्त प्रमाणात सर्व महिलांमध्ये आढळते. पाेहणे वा नाव चालवणे तर दूर पण नदीकाठी उभे राहतानाही त्यांचे पाय थरथरतात.
बहुतेक महिला पालीला जास्त घाबरतात. पालीसंबंधी त्यांचे मत असते की, पालीच्या शरीरात एवढे विष असते की, ती सापाला चावली तर सापही मरेल. या वास्तविक भीतींशिवाय काही काल्पनिक भीतीही असतात. या भीती अंधविश्वासातून उत्पन्न हाेतात. काल्पनिक भतीचे रुग्ण बहुधा ग्रामीण व अशिक्षित असतात. या भीतीच्या राेग्यांमध्येही महिलांची संख्या जास्त असते. यात भूत हडळ यांची भीती मुख्य असते.भीतीवरील उपचारांमध्ये धाडसी कथा खूप उपयुक्त असतात. निर्भीडतेचा गुण उत्पन्न करण्यासाठी महिलांनी आपली भित्र्या प्रवृत्तीच्या मैत्रिणी व शेजारणींशी संपर्क कमी ठेवायला हवा व धाडसी महिलांच्या सहवासात जास्त राहायला हवे.