तीळगूळ व हलव्याच्या दागिन्यांचा दत्तमहाराजांना महानैवेद्य दाखवला

17 Jan 2026 14:25:48
 
 

tilgul 
 
तीळगूळ, गूळपाेळी, तीळवडी, पापडी, गूळमाेदकाच्या ताेरणांनी सजलेले दत्तमंदिर...हलव्याचा नयनरम्य मुकुट आणि सुबक असा हलव्याचा हार, हलव्याचे वाळे, कानातले डूल, पैंजण आणि सुकामेव्याने सजवलेला अंगरखा परिधान केल्यावर दिसणारीदत्तमहाराजांची विलाेभनीय मूर्ती पाहण्यासाठी दत्तमंदिरात भाविकांनी अलाेट गर्दी केली. मकर संक्रांतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्त महाराजांना गूळ, तीळगूळ आणि तिळाच्या अनेक पदार्थांचा महानैवेद्य दाखवण्यात आला.
 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, काेषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डाॅ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे यांच्यासह भाविक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. राेहित टिळक, उपाध्यक्ष प्रणिती टिळक यांच्या हस्ते माध्यान्ह आरती झाली. मकर संक्रांतीनिमित्त दत्तमहाराजांना दाखवलेला तीळगूळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. 18 जानेवारी रात्रीपर्यंत ही आरास भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0