ब्रिटनच्या वेल्स मधील टेनबी शहरात उभारण्यात आलेली ‘द डायनासाेर थीम पार्क’ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सन 1994 मध्ये सुरू झालेल्या या पार्कमध्ये 36 राइड्स आणि 90 पेक्षा जास्त डायनासाेर माॅडेल आहेत. ही पार्क विशेषत: मुले आणि कुटुंबांमध्ये जास्त लाेकप्रिय आहे. या पार्कला ‘जुरासिक पार्क’चे रियल व्हर्जन सुद्धा म्हटले जाते. या थीम पार्कमध्ये दरवर्षी 60 हजार पेक्षा जास्त लाेक सहलीसाठी येतात. ट्रिप अॅडव्हायझरवर या पार्कला 5 पैकी 4.2 रेटिंग मिळाली आहे. पार्कच्या मालकांनी तिला विक्रीसाठी क्रिस्टी अँड कंपनीच्या द्वारे लिस्ट केले आहे. या पार्कची किंमत सुमारे 40 काेटी रुपये ठेवण्यात आली आह