मशीन लर्निंगद्वारे वैज्ञानिकांनी रिअल-टाइम हॅपीनेस इंडे्नस बनवला

17 Jan 2026 14:56:30
 

machine 
 
जग सध्या एका विचित्र स्थितीतून जात आहे. झाेप, तणाव, वर्कआउट, ध्यान, हृदयाचे ठाेके आणि आता आनंद ही भावना सगळ्याचे स्काेर बनत आहेत. माॅर्निंग स्लीप स्काेर. इव्हनिंग स्ट्रेस स्काेर, डेली मूड स्काेर असे सगळे स्काेरमध्ये माेजले जाऊ लागले आहेत. जीवन अचानक लाइव्ह डॅशबाेर्डसारखी हाेऊ लागले आहे.लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅम्निस आणि दक्षिण आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ जाेहानसबर्ग यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत े सिद्ध झाले आहे की, आपल्या भावनांना रिअल-टाइममध्येही माेजले जाऊ शकते.माणसाला काेणताही प्रश्न न विचारता, केवळ इंटरनेटवरील डेटावरून या गाेष्टी समजू लागल्या आहेत. समाजाचा आनंद माेजण्याचा प्रयत्न ही पाहणी अर्थशास्त्रज्ञ आणि वेल- बीइंगच्या तज्ज्ञांनी केली आहे.
 
प्रा. तलीता ग्रेयलिंग आणि प्रा. स्टेफनी राॅसू गेल्या अनेक वर्षांपासून हॅपीनेस इकाॅनाॅम्निसवर काम करत आहेत. म्हणजे समाजाचा आनंद कसा माेजला जाईल आणि काेणते तंत्रज्ञान यामध्ये मदत करेल, यावर संशाेधन सुरू आहे. प्राे. ग्रेयलिंग यांनी सांगितले की, हे माॅडेल आनंदाची खाेली नव्हे पण, त्याची दिशा जरूर पकडू शकते. म्हणजे एखादा सण, चांगली बातमी, हवामानातील बदल किंवा तणावाची घटना समाजाचा मूड कसा बदलताे, हे लगेच दिसू लागते.उदाहरणार्थ सणामध्ये आनंद आणि आभाराची भावना वाढते.
आर्थिक संकटाच्या काळी तणाव, थकणे, काळजी वाढते. डिजिटल दमवणुकीच्या दिवसांमध्ये शांत संगीत, डिजिटल डिटाॅ्नस ट्रेंड हाेऊ लागते.भावना जाणवण्यापूर्वी माेजल्या जातील हे माॅडेल सरकार, मानसिक- स्वास्थ्य तज्ज्ञ आणि कंपन्यांना संकेत देते की, कधी लाेक तणावाखाली आहेत, कधी आनंदी आहेत, काेणत्या घटनेचा समाजाच्या भावनांवर माेठा प्रभाव पडत आहे.
 
पहिल्यांदाच आनंद ही भावना एक ‘लाइव साेशल इंडिकेटर’ बनत आहे. ही पिढी कदाचित पहिली पिढी असेल, जी आपल्या भावना जाणवण्यापूर्वी माेजू लागेल. पण प्रश्न हा आहे की, आपण आनंदाची भावना जगताे, की केवळ स्काेर पाहून जगण्याचा भ्रम पाळताे.
समाजातील आनंद, तणाव सांगू शकेल इंटरनेट संशाेधकांनी 69 भावनात्मक शब्द शाेधले आहेत. त्यामध्ये हॅपी, सॅड, स्ट्रेस, ग्रेटिट्यूड सारखे शब्द सहभागी आहेत.या शब्दांना प्रत्येक दिवशी हाेणाऱ्या सर्च वाॅल्यूमला यूके आणि नेदरलॅण्ड या देशात ट्रॅक केले गेले.
मशीन-लर्निंग माॅडेलने हे शाेधून काढले आहे की, काेणते शब्द आनंद ही भावना चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. त्यानंतर डिजिटल हॅपीनेस स्काेरची तुलना त्या देशांच्या खऱ्या वेल-बीइंग सर्व्हेबराेबर केली.त्याचे परिणाम आश्चर्यकारक हाेते. ऑनलाइन शाेध ट्रेंड्समधून कळले की, हॅपीनेस इंडे्नस वास्तविक सर्वाेच्च भावनात्मक स्तरांबराेबर मिळताे. म्हणजे इंटरनेट सांगत आहे की, समाज खुश आहे की तणावामध्य
Powered By Sangraha 9.0