चीनची राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा एकदा एक अनाेखा ट्रेंड आकार घेत आहे. विशेषतः तरुण लाेक उद्यानांमध्ये जातात आणि झाडांना मिठी मारतात. ते रस्त्यांवर किंवा अगदी पाॅश भागातही जातात आणि तिथेही झाडांना मिठी मारत उभे राहतात. तरुण पिढीला आता एकटेपणा जाणवू लागला आहे आणि ते सतत तणाव आणि चिंतेमध्ये असतात.तरुण लाेक या समस्येपासून मुक्त हाेण्यासाठी झाडांना मिठी मारतात. ते झाडांच्या सालीला स्पर्श करतात आणि कानांनी झाडाच्या आतील आवाज ऐकण्याचा आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करतात.
चीनमध्ये काेराेनानंतर अनेक तरुणांनी ‘वन थेरपी’ची मदत घेतली.तणावाखाली असलेले लाेक झाडांशी बाेलायचे, यामुळे त्यांना खूप बरे वाटायचे.‘वन थेरपी’ घेणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा खूप जास्त हाेती. आता, एका नवीन कारणासाठी, शहरांमध्ये उद्यानांच्या आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांना लाेक मिठी मारत आहेत आणि झाडांशी बाेलत आहेत. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, ही पद्धत तणावपूर्ण नात्यांमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या लाेकांसाठी खूप प्रभावी ठरू शकते.