दिघी रेंजवर सांझा श्नती सराव; लष्करासाेबत प्रशासनातील विविध घटकांचा सहभाग

17 Jan 2026 14:24:32
 

dighi 
 
खडकी लष्करी केंद्रातील दिघी रेंजवर लष्करी व मुलकी संस्थांमधील सांझा शक्ती सराव नुकताच यशस्वीरित्या पार पडला. सध्याची गुंतागुंतीची सुरक्षाविषयक आव्हाने आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी लष्करी व मुलकी संस्थांमध्ये उत्कृष्ट सामंजस्य निर्माण करणे, हा या सरावाचा मुख्य हेतू हाेता.लष्कराबराेबरच महाराष्ट्र पाेलिसांचा फाेर्स वन, अग्निशमन दलासारख्या साेळा मुलकी संस्थांतील मिळून साडेतीनशे जवान या सरावात सहभागी झाले हाेते.
 
आपत्कालीन परिस्थितीत शिघ्र प्रतिसाद, सुसंघटित कृती आणि याेग्य समन्वय साधून केलेल्या कारवायांचा यात समावेश हाेता. नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वाे च्च प्राधान्य देत लष्करी व मुलकी संस्थांमधील सामंजस्य वाढवण्याच्या दृष्टीने हा सराव उपयुक्त ठरला. लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह यावेळी उपस्थित हाेते. पूरग्रस्त भागात लष्कराने केलेले काम, निवृत्त जवान आणि वार नारींसाठी लष्कर करत असलेले काम आदींची ले.ज. कुशवाह यांनी माहिती दिली. तसेच, सध्याच्या एकूणच बदलत्या परिस्थितीत मुलकी प्रशासनातील विविध घटक आणि लष्करादरम्यान उत्कृष्ट समन्वय असणे गरजेचे असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Powered By Sangraha 9.0