मुख्यमंत्री साैर कृषिवाहिनी याेजनेला सुवर्ण पुरस्काराने गाैरवले

17 Jan 2026 14:23:01
 

CM 
 
राज्यातील 45 लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणाऱ्या मुख्यमंत्री साैर कृषिवाहिनी याेजना 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएसईबी साेलार अ‍ॅग्राे पाॅवर लिमिटेडला येथे स्काॅच समूहाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने गाैरवण्यात आले.राज्याच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात एमएसईबी साेलार अ‍ॅग्राे पाॅवर लिमिटेड अंतर्गत मुख्यमंत्री साैर कृषिवाहिनी याेजना 2.0ची अंमलबजावणी सुरू आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र यांनीही या याेजनेला गती दिली. गेल्या सव्वा वर्षात 3300 मेगावाॅट क्षमतेचे साैरऊर्जा प्रकल्प या याेजनेतून सुरू झाले असून, त्याद्वारे राज्यातील 40 लाख एकर शेतजमिनीवर सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरूझाला आहे.देशाच्या विकासात याेगदान देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रांतील विविध याेजना व संस्थांना दिला जाणारा स्काॅच समूहाचा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा सन्मानआहे.
 
पुरस्कारासाठी ऊर्जा वर्गवारीत मुख्यमंत्री साैर कृषिवाहिनी याेजना 2.0च्या कामगिरीचे विविध तज्ज्ञांकडून मूल्यमापन करण्यात आले. शेतकरी लाभार्थ्यांचे अभिप्राय घेण्यात आले. यासह तज्ज्ञांच्या मतदानाद्वारे देशात प्रथम ठरलेल्या या याेजनेला स्काॅच सुवर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आला. एमएसईबी साेलार अ‍ॅग्राे पाॅवर लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतारे व अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.जगातील सर्वांत माेठ्या 16 हजार मेगावाॅट विकेंद्रीत साैरऊर्जा प्रकल्पांच्या मुख्यमंत्री साैर कृषिवाहिनी याेजनेद्वारे 65 हजार काेटींच्या गुंतवणुकीसह 70 हजारांवर ग्रामीण राेजगार निर्मिती सुरू आहे. या याेजनेमुळे महावितरणच्या वीज खरेदीत 10 हजार काेटींच्या वार्षिक बचतीसाेबतच क्राॅस सबसिडीत 13500 काेटींनी वार्षिक बाेजा कमी हाेईल. त्यामुळे प्रामुख्याने औद्याेगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त हाणार आहेत. या याेजनेत आतापर्यंत 3300 मेगावाॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले असून, सुमारे 8 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
Powered By Sangraha 9.0