जेव्हा मूल 2 ते 4 वर्षांचे असते तेव्हा त्याचा मेंदू अत्यंत वेगाने विकसित हाेत राहात असताे. ते प्रत्येक गाेष्ट अत्यंत लक्षपूर्वक पाहात, ऐकत समजून घेण्याचा प्रयत्न करते.पालकांद्वारे बाेललेले शब्द व केलेल्या कामांचा परिणामही त्यांच्यावर खूप खाेल हाेत असताे.यासाठी मुलाच्या सकारात्मक विकासासाठी काही गाेष्टींचे भान ठेवायला हवे.परिणामाऐवजी मुलाच्या प्रयत्नांचे काैतुक करा मुलाला काैतुकाची गरज असते, पण काेणत्या हे समजणे महत्त्वाचे आहे. फक्त परिणामांचे काैतुक केल्यास मूल फक्त परिणामांवर लक्ष देते. याऐवजी त्याच्या प्रयत्नांचे व परिश्रमाचे काैतुक करा. उदारणार्थ ‘वा, तू पझल पूर्ण केले खूप छान.’ असे म्हणण्याऐजी म्हणा, ‘मला चांगले वाटले की, तू हे पझल साेडवण्यासाठी एवढे श्रम घेतलेस.’ यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढून श्रम करण्याची प्रेरणा वाढते.
त्यांच्या ‘का’ ला उत्तर द्या लहान मुले प्रत्येक गाेष्टीबद्दल ‘का’ असे विचारतात. त्यांच्या का चे उत्तर देणे टाळू नका.कारण आपण त्याच्या प्रश्नांना उत्तर द्याल तर ते त्यांना भविष्यात शिकण्यासाठी प्राेत्साहित करील. पण प्रश्नाचे सरळ उत्तर देण्याऐवजी म्हणा, ‘तू याविषयी काय विचार करताेस?’ वा ‘चल, आपण दाेघे मिळून याचे उत्तर शाेधू.’ यामुळे मुलात जिज्ञासा व समस्या साेडवण्याची क्षमता विकसित हाेते व ते स्वावलंबी हाेते.सकारात्मक दृष्टिकाेन वाढवा एका शाेधानुसार मुले आई-वडिलांनी स्वत:विषयी सांगितलेल्या गाेष्टींनीही प्रभावित हाेतात. जर आपण सांगितले की, ‘मी काही करू शकत नाही.’, ‘माझ्याकडून काेणतेही काम हाेत नाही.’ तर मूलही हााच विचार करताे की, प्रयत्न करून काेणताही फायदा हाेत नाही.
यासाठी स्वत:विषयी नकारात्मक बाेलणे टाळा. तसेच मुलावरही नकारात्मक आराेप (उदा. तू घाणेरडा आहेस, तुला काही येत नाही इ.) करू नका. जेणेकरून मूल आत्मप्रेरणेची भावना शिकू शकेल.प्रेम व आपुलकी व्यक्त करा सर्वांत महत्त्वाची गाेष्ट ही की, मुलाकडे आपले प्रेम व आपुलकी शब्दांत व्यक्त करा.त्याला सांगा की ताे आपल्यासाठी किती खास आहे. ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते/ताे’ वा ‘‘तू माझ्या जीवनातल सर्वांत माेठा आनंद आहेस.’ या वा्नयांनी त्याच्या मनात सुरक्षेची व आपुलकीची भावना जागते जी त्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे.कामाला ‘नकार’ देण्यापूर्वी विचार करा मुलांना वारंवार ‘नाही’ म्हणाल्यास त्यांची रचनात्मकता व जिज्ञासा कमी हाेते. यासाठी सरळ ‘नाही’ न म्हणता प्रथम समजून घ्या की ती काय सांगत आहेत त्याला पूर्णपणे नाही म्हणणे याेग्य आहे का? जर नसेल तर ‘अटींसाेबत हाे’ म्हणा. उदा. जर ते भिंतीवर चित्र काढू इच्छित असतील तर आपण त्यांना सांगावे की, ‘तू चित्र काढू शकताेस पण या कागदावर, यामुळे भिंत खराब हाेणार नाही.यामुळे ते सीमाही समजतात व त्यांची काही नवे करण्याची इच्छाही टिकून राहते.