गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार: आयु्नत साैरभ राव

15 Jan 2026 13:07:05
 
 

thane 
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 11500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियु्नती करण्यात आली असली, तरी त्यांपैकी अद्याप 2128 अधिकारी आणि कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत.त्यामुळे महापालिकेने अशा कर्मचाऱ्यांना नाेटीस बजावून त्यांच्यावर फाैजदारी कारवाई सुरू केली आहे.त्यामुळे निवडणूककामी गैरहजरीमुळे कर्मचारी अडचणीत आल्याचे चित्र आहे.ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रे आहेत. तेथे एकूण राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण 11500 कर्मचारी नियु्नत करण्यात आले आहेत. यात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 आणि 3, शिपाई अशा सर्वांचा समावेश आहे.हे सर्व कर्मचारी विविध आस्थापनांत कार्यरत आहेत.
 
सुरुवातीला 3641 अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामावर रुजू झालेले नव्हते. त्यामुळे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचे आदेश आयु्नत साैरभ राव यांनी दिले हाेते. त्यानंतर महापालिकेने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नाेटिसा बजावून कारवाईचा बडगा उगारला हाेता.नाेटिसा मिळताच अधिकारीकर्मचाऱ्यांनी मुख्यालयात धाव घेत गैरहजर राहण्यामागचे स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली हाेती. सुमारे 1513 अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामावर हजर झाले हाेते. अद्यापही 2128 कर्मचारी निवडणूक कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नाेटिसा बजावून त्यांच्यावर कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
Powered By Sangraha 9.0