काेयना जलसागरास आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

15 Jan 2026 13:09:39
 
 
koyna
 
काेयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलून ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज काेयना जलसागर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे काेयना परिसरासह पाटण तालुक्यात समाधान व अभिमानाची भावना व्य्नत हाेत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या नामकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात हाेता.त्याला अखेर यश आले. या मागणीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गांभीर्याने घेत सविस्तर अहवाल मागवला.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या मागणीनुसार 16 एप्रिल 2025 राेजी मंत्रालयात जलसंपदा विभागाची बैठक झाली. त्यानंतर 26 डिसेंबरला विखे पाटील यानी जलसंपदा महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना धरणाच्या नावात तातडीने बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार काेयना धरणाचे अधिकृत नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज काेयना जलसागर असे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0