आजच्या काळात निरनिराळ्या प्रकारचे स्किनकेअर प्राॅडक्ट्स आपल्या दरराेजच्या आयुष्याचा भाग बनले आहेत. साेशल मीडियावर प्रत्येक आठवड्यामध्ये एक नवे प्राॅडक्ट आणि नवीन स्किन-केअर रुटीन ट्रेंडमध्ये येते. अशामध्ये आता एक नवीन आणि उलटा ट्रेंड समाेर आला आहे ज्यामध्ये स्किन-केअरपासून थाेड्या वेळेसाठी ब्रेक घेण्याची गाेष्ट आहे.आपली त्वचा एक शरीराचा जिवंत भाग आहे ज्याच्यामध्ये स्वतःला संतुलित ठेवण्याची प्राकृतिक क्षमता असते. परंतु जेव्हा आपण जरुरीपेक्षा जास्त प्राॅडक्ट्स विशेषतः रेटिनाॅल, हायाेल्युराेनिक अॅसिड, नियासिनामाईड यांसारख्या अॅक्टिव्ह इंग्रिडियन्टसचा वापर करताे तेव्हा त्वचेवर दबाव पडू शकताे. त्यामुळे इरिटेशन, रेडनेस आणि ब्रेकआऊट वाढू शकताे. स्किन- फास्टिंगचे मानणे आहे की जेव्हा तुम्ही स्किनला थाेड्या काळासाठी एकटी साेडून देता तेव्हा ती स्वतःचे नॅचरल ऑइल बॅलन्स आणि रिपेअर सिस्टिमला पुन्हा अॅक्टिव्ह करू शकते.
हल्ली खूप लाेक ओव्हर स्किन-केअरमुळे त्रस्त आहेत. खूप स्किन-केअर प्राॅडक्ट्स लावूनही स्कीममध्ये काेणतीही सुधारणा दिसत नाही. उलट स्किन जास्तच सेन्सिटिव्ह हाेते. अशामध्ये स्किन-फास्टिंग एक साेपा आणि दिलासा देणारा पर्याय म्हणून समाेर आला आहे. या ट्रेंडचे मूळ जपान आणि काेरियन ब्यूटी फिलाॅसाॅफीमध्येही आढळून येते जिथे स्किनला गरजेपेक्षा जास्त हाताळण्या ऐवजी बॅलन्सवर जाेर देण्यात येताे.स्किन-फास्टिंग दरम्यान सुरुवातील स्किन थाेडीड्राय, टाईट किंवा डल झाल्याप्रमाणे वाटू शकते. असे अशामुळे हाेते कारण की स्किन खूप काळापासून बाहेरच्या प्राॅडक्ट्सवर अवलंबून राहिलेली असते.तथापि, काही काळाने बऱ्याच लाेकांना असे वाटते की त्यांची त्वचा जास्तच शांत, कमी रीअॅक्टिव आणि संतुलित झालेली आहे. स्किन-फास्टिंगचा काेणता असा कठीण नियम नाही. काही लाेक फक्त पाणी आणि सनस्क्रीन पर्यंत मर्यादित असतात. काही लाेक माईल्ड क्लेन्झर आणि हलके माॅइश्चरायझरचा वापर करतात पण अॅक्टिव्ह इंग्रिडियन्टस पासून दूर राहतात.
स्किन-फास्टिंग हे अशा लाेकांसाठी लाभदायक हाेऊ शकते जे प्राॅडक्ट्सचा उपयाेग जास्त करतात किंवा ज्यांची स्किन वारंवार इरिटेट हाेत असते. परंतु डर्मे टाेलाॅजिस्ट इशारा देतात की ही रीत सगळ्यांसाठी याेग्य नाही. ज्या लाेकांना एक्झिमा, राेसेशिया किंवा गंभीर अॅक्नेच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण स्किनकेअर सडून देणे नुकसानदायक हाेऊ शकते. सनस्क्रिनला कधीही स्किप करायला नकाेय.स्किन-फास्टिंग एखादा जादूचा उपचार नाही पण एक रिमाइंडर आहे. स्किनला जास्त नाही पण याेग्य देखभालीची गरज असते. याेग्यपणे आणि मर्यादित काळासाठी स्वीकारण्यात आलेले स्किन-फास्टिंग तुम्हाला तुमच्या स्किनची वास्तविक आवश्यकता समजावून देण्याला मदत करू शकते.