निद्रा देवीला प्रसन्न करा

    01-Jan-2026
Total Views |
 

sleep 
झाेपेची वेळ नक्की करा : झाेपण्याची आणि ठराविक वेळेत उठण्याची सवय लावणं चांगली झाेप येण्यासाठी खूप फायदेशीर आहे.यामुळे ही वेळ विश्रांतीची आहे हे शरीराला समजण्यास मदत हाेते आणि मेंदूला आरामशीर स्थितीत येण्यास यामुळे मदत हाेते. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एकाच वेळी झाेपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शरीराचं नैसर्गिक घड्याळ याेग्यरित्या कार्य करू शकेल.
 
स्क्रीन टाइम टाळा : झाेपण्या पूर्वी टीव्ही, माेबाईल, लॅपटाॅप इत्यादींचा अतिवापर टाळावा. या उपकरणांमधून उत्सर्जित हाेणारा निळा प्रकाश आपल्या झाेपेमध्ये व्यत्यय आणताे आणि मेलाटाेनिन (झाेपेला प्रेरित करणारं हार्माेन) चं उत्पादन कमी करताे. त्यामुळे झाेपण्यापूर्वी किमान 30 मिनिटं इलेक्ट्राॅनिक उपकरणांपासून दूर राहा.
 
हलकं अन्न खा : रात्री हलकं आणि सहज पचणारं अन्न खाणं फायदेशीर आहे.जड अन्नामुळे पाेटात गॅस, अपचन किंवा आम्लपित्त यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे झाेपेमध्ये अडथळा येताे. झाेपण्यापूर्वी जास्त तेलकट किंवा मसालेदार अन्न खाणं टाळावे आणि झाेपण्याच्या दाेन तास आधी जेवण करावे.
 
ध्यान किंवा प्राणायाम करा : ध्यान आणि प्राणायाम केवळ मानसिक शांतीच देत नाहीत, तर तणाव आणि चिंता देखील दूर करण्यासाठी मदत करतात. झाेपण्यापूर्वी काही मिनिटं ध्यानधारणा किंवा दीर्घ श्वासाेच्छवासाचा व्यायाम केल्यानं मन शांत हाेतं आणि चांगली झाेप येण्यास मदत हाेते. यामुळे मानसिक शांती तसंच शरीराला आराम मिळताे.
 
काेमट दूध किंवा हर्बल चहा प्या : झाेपण्या पूर्वी एक ग्लास काेमट दूध पिणं फायदेशीर आहे. दुधामध्ये असलेले ट्रिप्टाेफॅन अमिनाे सिड शरीरातील मेलाटाेनिनची पातळी वाढवतं, ज्यामुळे चांगली झाेप लागते.याशिवाय कॅमाेमाइल सारखा हर्बल चहा देखील मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि झाेप आणण्यासाठी उपयुक्त आहे.
 
आरामदायक वातावरण तयार करा : झाेपण्या पूर्वी खाेलीचं तापमान, प्रकाश आणि आवाज याकडे लक्ष द्या. चांगल्या झाेपेसाठी आरामदायक आणि शांत वातावरण आवश्यक आहे. अंधार, याेग्य तापमान आणि कमी आवाज झाेपेची गुणवत्ता वाढवतात.शक्य असेल, तर आपण हलक्या सुगंधाचा वापर करा. ज्यामुळे झाेपेची गुणवत्ता सुधारण्यात मदत हाेते्.
 
नकारात्मक विचारांपासून दूर रहा : अनेक वेळा झाेपण्या पूर्वी मनात नकारात्मक विचार येतात किंवा चिंता सतावते, ज्याचा झाेपेवर परिणाम हाेताे.यासाठी दिवसभरातील चांगल्या गाेष्टी डायरीत लिहू शकता, ज्यामुळे मन प्रसन्न आणि संतुलित राहील. दिवसभरात केलेल्या चांगल्या गाेष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानं मनाला शांती मिळते आणि चांगली झाेप येण्यास मदत हाेते.
 
व्यायामाची याेग्य वेळ ठरवा : दिवसभरात केलेला व्यायाम शरीर निराेगी आणि तंदुरुस्त ठेवताे, परंतु झाेपण्यापूर्वी जास्त व्यायाम टाळावा. व्यायामामुळे ऊर्जा वाढते, ज्यामुळे झाेप येण्यास त्रास हाेऊ शकताे. जर झाेपण्यापूर्वी काही करायचे असेल तर लाइट स्ट्रेचिंग किंवा याेग साधना करू शकता.