प्रत्येकाचा असताेच मूळ स्वभाव

    08-Sep-2025
Total Views |
 

Health 
 
प्रत्येकवस्तू वा व्यक्तीचा एक आपला मूळ स्वभाव असताे. जाळणे हा अग्नीचा स्वभाव आहे. त्यामुळे अग्नीवर जाणून बुजून वा चुकून हात ठेवला तरी ताे जळणारच. सापाचा स्वभाव आहे विष ओकणे. त्याला दूध पाजले तरी ताे विषच टाकणार. विंचवाचा स्वभाव आहे डंख मारणे. त्याला कितीही प्रेमाने जवळ घेतले तरी डंखच मारणार. वास्तविक स्वभाव त्यालाच म्हणतात जाे बदलत नाही. एखाद्याचा व्यवहार काेणत्याही परिस्थितीत बदलत नसेल तर ताे त्याचा स्वभाव असताे. स्वभाव म्हणजे स्वत:चा भाव.चंदनाचा स्वभाव आहे सुगंध, भले ते हुंगा, उगळा, आगीत जाळा, तुकडे तुकडे करून टाका. ते सुगंधच देईल.चंदन तर त्याला ताेडणाऱ्या कुऱ्हाडीलाही सुगंधित करते. तसा पुरुषांचा स्वभावही सुगंध देणे-मातीत मिसळून सर्वांना सुगंधित करताे. इतर घटकांप्रमाणे परमात्म्याने माणसालाही एक मूळ स्वभाव दिला आहे. ताे आहे दयेचा, करुणेचा,क्षमेचा, शीलाचा, आपसातील प्रेम व बंधुभावाचा. पण दु:ख हे आहे की बहुतेक लाेक आपल्या मूळ स्वभावापासून दूर झाले आहेत.
 
त्यांनी समाजात अशांती पसरवली आहे. ते आपल्यावर एक खाेटे आवरण चढवून बसले आहेत.दुसऱ्यांच्या स्वभावाने बदलून स्वत:ला विसरून जाणे माणसाचा मूळ स्वभाव कसा असू शकताे. आज आपल्या प्रत्येक काम दिखावू झाले आहे. आपली प्रत्येक क्रिया आपल्याला स्वत:पासून दूर नेत आहे. कारण स्पष्ट आहे, आपण जे करीत आहाेत ते वरपांगी करीत आहाेत.प्राणांपासून नाही, हृदयापासून नाही, मनापासून नाही.एक स्वभाव संताचाही आहे. भल्या माणसाचाही आहे.जे शत्रू-मित्राविषयी वेगवेगळी भावना ठेवत नाहीत. काेणी शरीरात खिळेही ठेाेत आहे. तेव्हा ईसामसीहाप्रमाणे म्हणताे, ‘ए परमात्मा, याचे भले करण. यांना ते काय करीत आहे हे माहीत नाही. ’ काचेचे तुकडे खाल्ल्यानंतर ताे दयानंदाप्रमाणेच त्यावेळी म्हणताे, ‘ तू पळून जा. येथून निघून जा. राजाही माझा शिष्य आहे. त्याला तुझी हरकत कळली तर ताे तुला मृत्यूदंड देईल. कबीराप्रमाणे, तुळशीप्रमाणेच भल्याची इच्छा धरू शकताे भले त्याचे काेणी वाईट केले तरीही. हा आहे स्वभाव.