स्वत:वर एवढी टीका करण्याचे विचार का येतात?

30 Sep 2025 12:28:24
 

think 
 
सेमिनारमध्ये माझे प्रेझेंटेशन खूप खराब झाले.मी या जाॅबसाठी लायक नाही.त्या दिवशी लग्नसमारंभात मी सर्वांत वाईट दिसत हाेते.
बऱ्याचदा आपण आपली टिका स्वत:शी वा इतरांकडे करू लागताे. स्वत:चे याेग्य मूल्यांकन करणे चांगले पण नेहमी स्वत:ची तक्रार करीत राहणे अजिबात याेग्य नाही.मानसशास्त्र स्वत:ची टिका करण्याच्या सवयीला सेल्फ क्रिटिसिझम अर्थात आत्मटिका म्हणते.एक सीनियर सायकाेलाॅजिस्ट सांगते की, ‘स्वत:ची टिका वा स्वत:ची कठाेरतेने मूल्यांकन करण्याची प्रवृत्ती आहे.
 
आत्मटिका करणारी व्यक्ती अपयश व इतर लाेकांकडून नाकारले जाण्यास खूप घाबरते. काेणत्या ना काेणत्या गाेष्टीवरून ते नेहमी अपराधी भावनेने ग्रस्त राहतात. त्यांना लाेकांसाेबत सामाजिक संबंध राखण्यातही खूप अडचणी येतात.का निर्माण हाेते ही सवय ब्रिटिश मेडिकल जर्नलचा स्टडी सांगताे की, 90 टक्के केसेसमध्ये आत्मटिका करण्याची सवय लहापणीच निर्माण हाेते. ज्या मुलांचे आई-वडील आपल्या मुलांवर कमी प्रेम करतात, मुलांच्या चुकांबद्दल खूप जास्त ओरडतातअशी मुले माेठी हाेऊन आत्मटिकाकार हाेतात. नात्यांमध्ये देखभाल व बाॅन्डिंगचा अभाव प्रामुख्याने याचे कारण बनते.
 
साेबतच जर एखादी व्यक्ती दुराचरण वा एखाद्या प्रकारचा धक्का साेसलेली असेल तर तिच्यातही आत्मटिकेची प्रवृत्ती निर्माण हाेऊ शकते. या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊ या.मनात स्वत:वर टिका करण्याचे विचार अचानक तर येऊ शकत नाही. काही विशिष्ट प्रकारचे विचार ट्रिगरचे काम करते, जे नकारात्मक आत्मचर्चेकडे नेते. ते ट्रिगर ओळखायला हवेत. उदाहरणार्थ जर आपण एखाद्याला चुकीच्या नावाने हाम मारली व त्याचवेळी आपल्याला काेणी आपली चूक दाखवली तर आपण लाजून ‘आपण असे का केले?’ या विषयावर मनातल्या मनात मंथन करू लागताे. या छाेट्याशा चुकीसाठी स्वत:ला दाेष देऊ लागताे. नंतर पुढे हे आपल्याला सेल्फ क्रिटिसिज्मच्या अंधाऱ्या विहिरीकडे ढकलू लागते.
Powered By Sangraha 9.0