राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यात येणार आहे. या मार्गिकेच्या उभारणीतील आर्थिक अडचण दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने ही मार्गिका बांधावापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.त्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. मात्र, यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध न झाल्याने या मार्गिकेसाठी बीओटीच्या अनुषंगाने नव्याने निविदा काढण्यास विलंब हाेत हाेता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गिकेची उभारणी बीओटी तत्त्वावर करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आता लवकरच एमएसआरडीसी या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढणार आहएमएसआरडीसी 126 कि.मी.ची विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधणार आहे.
त्यानुसार या मार्गिकेतील नवघर ते बलवली या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेच्या बांधणीसाठी 11 पॅकेजमध्ये निविदा मागवण्यात आल्या हाेत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला.33 निविदा यासाठी सादर झाल्या. त्या निविदांची छाननी करत निविदा अंतिम करण्याची प्रतीक्षा असतानाच अचानक एमएसआरडीसीने ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी 36 ट्नके अधिक दराने निविदा सादर झाल्याने आणि प्रकल्प खर्च 19334 काेटींवरून वाढला. इतका निधी उभारणे अवघड झाल्याने अखेर हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारण्याचा निर्णय घेत यासंबंधीचा प्रस्ताव एमएसआरडीसीने राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला. जूनमध्ये राज्य सरकारने या प्रस्तावास मान्यता दिली.
त्यानुसार आधीच्या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर बीओटी तत्त्वावर नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, याबाबतचा शासन निर्णय जारी न झाल्याने निविदा रखडल्या हाेत्या.सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्यात येतील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22250 काेटी, तर संभाव्य व्याज 14763 काेटी रुपये अशा एकूण 37 हजार 13 काेटी रुपये खर्चासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.