माेबाइल फाॅरेन्सिक व्हॅनमुळे तपासास गती : पाटील

03 Sep 2025 18:39:32
 


Van
 
गुन्ह्यांचा छडा लावून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पाेलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने यु्नत साधनसामग्री देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली पाेलीस दलास अद्ययावत माेबाइल फाॅरेन्सिक व्हॅन व त्यासाेबत प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. त्यामुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पद्धतीने व अधिक सक्षमतेने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पाेलीस दलाला ताकद मिळाली आहे, असा विश्वास सांगलीचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्य्नत केला. पाेलीस दलास माेबाइल फाॅरेन्सिक व्हॅन व दाेन आयशर बसचे लाेकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. पाेलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयाेजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पाेलीस अधीक्षक संदीप घुगे आदी अधिकारी उपस्थित हाेते. या अत्याधुनिक व्हॅनसाेबत घटनास्थळावरील भाैतिक पुरावे गाेळा करण्यासाठी 16 विविध टेस्टिंग किटस् पुरवण्यात आल्या आहेत.पाटील यांनी हे विविध किट, त्याचा उपयाेग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
Powered By Sangraha 9.0