लाहाेर आणि टीव्ही अमृतसर लाहाेर आणि अमृतसर ही जुळी शहरं. फाळणीनंतर धार्मिक विभागणी झाली. सीमेच्या इकडेही पंजाब, तिकडेही पंजाबच. धर्म वेगळे, भाषा एक, संस्कृती एक, खानपान एक. पाकिस्तानचे अनेक खेळाडू पंजाबीतच बाेलत असतात. त्यामुळे भज्जी अर्थात हरभजनसिंग त्यांचा लाडका. ही जाहिरात टीव्ही ब्लॅक अँड व्हाइट असतानाच्या काळाची आहे. शिवाय हा टीव्ही खूपच प्राथमिक स्वरूपाचा हाेता. अगदी सुरुवातीला तर फक्त दूरदर्शन दिसायचं. रेडिओवरच्या स्टेशन शाेधणाऱ्या बटणासारखं एक खटक्याचं बटण दाेन, चार, सहा, आठ चॅनेल दाखवायचं. प्रत्येक खटक्यावर एक चॅनेल सेट केला जायचा.
दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी आणि प्रादेशिक वाहिनी ही दाेन प्रमुख चॅनेल्स असायची प्रत्येक ठिकाणी.राष्ट्रीय वाहिनीवरचे कार्यक्रम देशभर एकसमान दिसायचे, प्रादेशिक वाहिनी त्या त्या राज्यापुरती आणि तिच्यावरचे कार्यक्रम त्या राज्याच्या भाषेत असायचे प्राधान्याने. इथे या टीव्हीची जाहिरात मात्र वेगळीच गंमत सांगणारी. त्या काळात दाेन हजार रुपयांना म्हणजे घसघशीत किंमत माेजायला लावणारा हा टीव्ही अमृतसर केंद्राचे कार्यक्रम तर दाखवेलच, पण पीटीव्हीचे लाहाेर केंद्राचे कार्यक्रमही तुम्हाला पाहायला मिळतील, असं आमिष त्यांनी दाखवलंआहे. अगदी झी टीव्ही वगैरे चॅनेल आल्यानंतरही भारताच्या अनेक भागांमध्ये तिकडचे कार्यक्रम लाेकप्रिय हाेते. तिकडच्या मालिकांचा दर्जाही अधिक चांगला असायचा.