एकरकमी थकबाकी भरल्यास 50 ट्नके माफी: ग्रामविकास मंत्री जयकुमार गाेरे

03 Sep 2025 18:32:50
 

Gore 
 
गावे समृद्ध करण्यासाठी, गावांतील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी; तसेच शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध याेजना गावांत प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामविकास विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी गावांतील नागरिकांनी ग्रामपंचायतीचा थकीत कर एकरकमी भरल्यास त्यांना थेट 50 ट्नके सवलत देण्याची ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गाेरे यांनी केले.ग्रामविकास विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार असून, त्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिरात आयाेजित कार्यशाळेत गाेरे बाेलत हाेते.
 
यावेळी ‘यशदा’चे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी मुख्य कार्यकारीअधिकारी संदीप काेहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक अमाेल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी सचिन जगताप आदी उपस्थित हाेते.कर थकवणाऱ्या आणि निवडणुका आल्यावरच कर भरणाऱ्यांवर आता शासन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सलग पाच वर्षे ग्रामपंचायतीचा कर थकवणाऱ्यांवर निवडणूक लढवण्यासाठी निर्बंध घालण्याचा इशाराही गाेरे यांनी दिला. आवताडे, खरे यांनीही मनाेगत व्य्नत केले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आषाढी वारीतील उत्कृष्ट कामाबद्दल गाेरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0