दाेन हजार वर्षांचे झाड

27 Sep 2025 22:51:01
 
 


tree
 
या झाडाच्या पाेकळ खाेडांचा वापर 40 लाेकांना निवारा देण्यासाठी केला गेला आहे. ते 4 हजार 500 लिटर पाणी साठवू शकते.या झाडाच्या सालीपासून जाे तंतू निघताे, त्यापासून धागा तयार करून कपडे बनवले जातात. राेगप्रतिकारक श्नती वाढविण्यासाठी या झाडाची ताजी पाने खाल्ली जातात. बाओबाब फळाचे औषधी गुणधर्म आश्चर्यकारक आहेत. जसे की या झाडाच्या फळात संत्र्यापेक्षा 3 पट जास्त व्हिटॅमिन सी, पालकापेक्षा 50% जास्त कॅल्शियम आणि त्यात अँटीऑ्निसडंट्सचा भरपूर स्राेत आहे. बाओबाब या झाडाचे मराठी नाव आहे गाेरखचिंच. हा एक पानगळी वृक्ष आहे. खाेडाचा परीघ 100 फुटांपर्यंतही असताे. खाेडाचा जाडपापुद्रा राखाडी रंगाचा असताे.फुले मांसल 5 पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात.
 
त्यांना मंद सुवास असताे. फुले गळून तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भाेपळ्यांसारखी दिसतात. खाेडामध्ये माेठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते. त्यामुळेच पाणी कमी असलेल्या प्रदेशात सुद्धा हे वृक्ष तग धरतात. त्यांचे आयुष्य 1 हजार वर्ष असते. खाेडे पाेकळ झालेले काही वृक्षसुद्धा आढळले आहेत. अशा खाेडात मादागास्करमध्ये आलेल्या वादळाच्या वेळी काही लाेकांनी आश्रय घेतला हाेता.महाराष्ट्रात नगरजिल्ह्यात धमाेरी येथे पुरातनवृक्ष असून परिसरातील लाेक येथे पूजा करतात. गाेरक्षनाथ यांचे शिष्य अडबनगीनाथ यांनी याच ठिकाणी तप केले, अशी आख्यायिका आहे.
Powered By Sangraha 9.0