साैरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध हाेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट हाेत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आराेग्य संवर्धन उपाय हाेणे गरजेचे आहे.या साैरऊर्जा प्रकल्पांतून माेठ्या प्रमाणात राेजगार निर्मिती हाेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितले.पंतप्रधानांनी राज्यातील 2458 मेगावाॅट क्षमतेच्या 454 साैरऊर्जा प्रकल्पाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लाेकार्पण ेले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., राज्यातील पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजना 2.0 आणि पीएमकुसुम सी बी-मागेल त्याला साैर कृषी पंप याेजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित हाेते.
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी राज्यातील साैरऊर्जा प्रकल्पांतील लाभार्थ्यांशी संवाद साधला.मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेत सहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा हाेत आहे. यामुळे 32.08 लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे; तसेच इतर विविध याेजनांतून राज्यात आतापर्यंत 6 लाख 46 हजार 694 साैर कृषिपंप बसवण्यात आले असून, राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या याेजनेमुळे 20.95 लाख एकर जमीन ओलिताखाली आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.