महाराष्ट्राची परंपरा असलेल्या गणेशाेत्सवाला राज्य शासनाने राज्य महाेत्सवाचा दर्जा दिला असून सामाजिक साैहार्द, कला-संस्कृतीचे प्रतीक असलेल्या गणेशाेत्सवाची व्यापकता येत्या काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केले.रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळ स्पर्धे च्या राज्य व जिल्हास्तरीय पारिताेषिक वितरण कार्यक्रमात शेलार बाेलत हाेते.
यावेळी काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, आमदार महेश सावंत, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु. ल. देशपांडे अकादमीच्या संचालकमीनल जाेगळेकर उपस्थित हाेत्या.राज्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बाधितांना आवश्यक मदत शासन स्तरावरून करण्यात येत आहे. या पूरस्थितीत गणेश मंडळांनीही सहकार्य करण्याचे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.चित्रनगरी, गाेरेगाव गणेश मंडळाने पारिताेषिकाची र्नकम मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याचेही शेलार यांनी जाहीर केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा पारिताेषिक व सन्मानचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला.