राज्यातील रस्ते हाेणार खड्डेमु्नत; दुरुस्तीसाठी 1296 काेटींचा निधी

27 Sep 2025 22:40:57
 

road 
 
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या तातडीने देखभाल व दुरुस्तीची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 2025-26 या कालावधीसाठी 1296.05 काेटींच्या निधीस मंजुरी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी दिली.सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमु्नत रस्ते निर्मितीस सरकारचे प्राधान्य आहे.या निधीच्या मंजुरीमुळे तातडीची दुरुस्ती कामे हाेणार आहेतच शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वृक्षाराेपण व संवर्धन माेहिमेमुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल.
 
खड्डेमु्नत, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध हाेतील. प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत हाेईल.अपघात राेखता येतील. रस्त्यांच्या आजूबाजूला हरित पट्टा तयार हाेऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल, असे त्यांनी सांगितले.या निधीद्वारे राज्यातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. पावसामुळे बाधित झालेल्या मार्गांची दुरुस्ती तसेच पूरक कामे हाती घेण्यासाठी हा निधी उपयाेगात आणला जाईल.एकूण आठ प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. प्रत्येक विभागातील कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.केवळ दुरुस्तीच नव्हे, तर कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0