टाचदुखी हाेण्यामागची कारणे आणि उपाय समजून घ्या

27 Sep 2025 22:54:23
 

Health 
 
दिवसभर आपण ज्या पायांवर उभे असताे ते पाय मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं.मात्र कधी आपल्या पाेटऱ्या दुखतात तर कधी गुडघे. मात्र टाचदुखी ही तर बहुतांश महिलात अतिशय सामान्य समस्या दिसते. टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही.मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला टाच किंवा पाय जमिनीवर टेकवता येत नाही.बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढताे, मात्र कालांतराने हा त्रास वाढत जाताे. यामागील कारणे काय आणि त्यावर काेणते उपाय केल्यास आराम मिळू शकताे याविषयी जाणून घेऊया.
 
कारणे : वाढतं वजन : वजनाचा पूर्ण भार शरीरावर येत असताे. त्यामुळे वजन सतत वाढत असेल तर त्यामुळे टाचा दुखू शकतात. यासाठी व्यायाम, आहार यांचा याेग्य अवलंब करुन वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक असते.
 
चपला किंवा बूट: चपलांचा साईज चुकीचा असेल तरी टाचांना त्याचा त्रास हाेताे. इतकेच नाही तर चपलांचे साेल चांगल्या दर्जाचे नसेल, खूप माेठ्या हिल्स सतत घालत असू तरी पाय आणि टाचा दुखण्याचे प्रमाण वाढते.यासाठी याेग्य मापाच्या, चांगल्या दर्जाच्या चपला वापरायला हव्यात.
 
कामाचे स्वरुप : सतत उभं राहायचे काम असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी पाय आणि टाचा दुखू शकतात. त्यामुळे कामाचे स्वरुप लक्षात घेऊन त्यानुसार याेग्य त्या गाेष्टी करणे आवश्यक असते.
 
उपाय :  रात्री झाेपताना टाचांना बर्फाने शेकणे हा साेपा उपाय आहे. यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळून टाचदुखी काही प्रमाणात आटाेक्यात येते.
 
 टाचांना तेलाने मसाज केल्यास चांगला आराम मिळताे. त्यामुळे टाचांना नियमितपणे शक्य तेव्हा तेल काेमट करुन मसाज करायला हवा.यासाठी माेहरीचं तेल वापरलं तरी चांगला फायदा हाेताे.
 
 गरम पाण्यात मीठ घालून त्यात टाचा बुडवून ठेवल्यास त्याचाही फायदा हाेताे.आंबेहळद हा उपयुक्त घटक असून दुखणाऱ्या टाचांना याचा लेप लावल्यास खुप चांगला फायदा हाेताे.
 
 आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, खनिजे या सगळ्या गाेष्टींचे प्रमाण चांगले ठेवावे.रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे, आंबवलेले किंवा आंबट पदार्थ कमी खाणे हा चांगला उपाय आहे.
Powered By Sangraha 9.0