प्रेम देणे ही जीवनातील अत्यंत सुंदर गाेष्ट आहे

24 Sep 2025 23:58:27
 
 

home 
प्रेम देणारा राजा असताे : मला प्रेम द्या असे म्हणण्याऐवजी प्रेम द्यायला सुरुवात करा. प्रेम वाटत राहा म्हणजे तुम्हाला नक्की प्रेम मिळेल. फक्त प्रेम देत राहा. कारण प्रेम देणे ही अत्यंत सुंदर गाेष्ट आहे. प्रेम दिल्यामुळे आपण सम्राट हाेता. घेणे अत्यंत तुच्छ अनुभव आहे कारण त्यामुळे आपण भिकारी हाेता.
 
प्रेम दिल्याने वाढत राहते : प्रेमाविषयी बाेलायचे तर भिकारी हाेऊ नका. सम्राट रहा.कारण आपल्यात ही गुणवत्ता अफाट आहे.तुम्हाला जेवढे देता येईल तेवढ देत जाऊ शकता. प्रेम उपचार नसून गुणवत्ता आहे.अशी गुणवत्ता जी दिल्यामुळे वाढत राहते.ते पूर्णपणे उधळा. कंजुष व्यक्ती गुण पाहून प्रेम करीत असताे. आपण प्रेमाने ओतप्राेत भरलेले आहात. आपण प्रेमाने भरलेले ढग आहात व ढग काेठे बरसायचे हा विचार करीत नसताे. ते मागू नका. काेणी येऊन आपल्यावर प्रेम करील अशी वाटही पाहू नका. फ्नत ते देत राहा.
 
असे द्यावे प्रेम : आपण काेणालाही प्रेम द्या. एखाद्या अपरिचितालाही. आपण काहीतरी अमूल्य वस्तू देत आहात हा प्रश्प नाही. काहीही, थाेडीशी मदत करणेही पुरेसे असते. दिवसाचे चाेवीस तास आपण जे काही करता ते प्रेमाने करा. यामुळे आपल्या मनातील पीडा नाहीशी हाेईल.कारण आपण एवढे प्रेममय, प्रेमळ व्हाल की लाेक आपल्यावर प्रेम करू लागतील.हा स्वाभाविक नियम आहे की, आपण जे देता तेच आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असते. आपली समस्या हीच आहे की, आपले हृदय प्रेमाने भरलेले असूनही आपण देण्यात कंजुषी करीत असता. त्यामुळे तेच प्रेम आपल्यावर ओझे झाले आहे. मन माेकळे राखण्याऐवजी आपण ते जखडून ठेवले तर त्याचा आपल्यालाच त्रास हाेत राहील.
 
प्रेम हेच औषध : ही फक्त सजीव माणसाचीच गाेष्ट नाही तर आपण एखाद्या खुर्चीलाही प्रेमाने स्पर्श करू शकता. याचा संबंध वस्तूशी नव्हे तर आपल्याशी आहे.तेव्हा आपल्याला गहन शांती अनुभवाला येईल व तुमचे ओझे उतरू लागेल. तुम्ही समग्र विरघळू लागाल. तुमच्या मनातील तणाव दूर करणारे प्रेम हे औषध आहे.त्यामुळे तुम्ही तणावरहीत हाेत राहाल.
Powered By Sangraha 9.0