एच.एच.सी.पी. हायस्कूल, हुजूरपागाप्रशालेला स्वीडीश विद्यार्थ्यांची भेट

02 Sep 2025 14:52:00
 
 huj
पुणे, 31 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
म.ग.ए.संस्थेच्या एच.एच.सी.पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे येथे मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी स्वीडनच्या 12 विद्यार्थ्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‌‘अतिथी देवो भव‌’ या उक्तीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशालेच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत औक्षण करून केले. तसेच लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी सलामी देत त्यांचे स्वागत केले.
 
या कार्यक्रमादरम्यान त्यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केलेले फुलांचे बुके, बुकमार्क आणि नथ देण्यात आली. त्यांच्या हातावर मेंदी काढण्यात आली. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी त्यांच्याशी संवाद साधत भारतीय संस्कृती व स्वीडीश संस्कृती याच्यातील साम्य व फरक यावर चर्चा केली. भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून प्रशालेच्या विद्यार्थिनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन, संत गोरा कुंभार ही संगीत नाटुकले, भरतनाट्यम, पुस्तक दहीहंडी, लीपन आर्ट या सारख्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यानंतर त्यांनी शाळेतील गृहविज्ञान विभागास भेट दिली. तिथल्या पदार्थांची चव चाखत विद्यार्थिनींचे कौतुक केले.
 
हा कार्यक्रम पी. एम. शहा फाउंडेशन व महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमास म.ग.ए.संस्थेच्या अध्यक्ष शालिनीताई पाटील, सचिव रेखा पळशीकर, तसेच पीएम फाउंडेशनच्या सरस्वती मेहता, श्री. फडतरे सर, प्रो. नेहा जाधव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका केतकी पेंढारकर, उपमुख्याध्यापिका संध्या गायकवाड, प्रशालेचे सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा जमदाडे आणि अनघा केळकर यांनी केले.
Powered By Sangraha 9.0