लोकअदालतीत महावितरणची1057 प्रकरणे निकाली काढण्यात आली

19 Sep 2025 14:19:08
 
 
Maha
 
पुणे, 18 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत महावितरणची 1057 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून महावितरणची 2 कोटी 18 लाखांची वसुली झाली. यात दाखल पूर्व व प्रलंबित, अशा दोन्ही प्रकरणांचा समावेश आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे परिमंडलातील गणेशखिंड, रास्ता पेठ व पुणे ग्रामीणमध्ये 51317 प्रकरणे लोकअदालतीपुढे ठेवण्यात आली होती. तसेच, वीजचोरीची 83 प्रकरणेही लोकअदालतीपुढे ठेवण्यात आली होती.
 
या 51317 प्रकरणांपैकी 1053 प्रकरणांत 2 कोटी 14 लाख 89 हजार 308 रुपयांचा भरणा झाला. यात सर्वाधिक पुणे ग्रामीण मंडलातील 10 ग्राहकांकडून 1 कोटी 3 लाख 41 हजारांचा, तर त्यापाठोपाठ रास्ता पेठ मंडल 96 लाख 97 हजार 818 व गणेशखिंड मंडलातून 17 लाख 84 हजार 930 रुपये वसूल झाले. वीजचोरीच्या 83 पैकी 4 गुन्ह्यांत तडजोड झाली. त्यातून 4 लाख 8 हजार 440 रुपयांची वसुली झाली. या लोकअदालतीच्या यशस्विततेसाठी प्रभारी विधी सल्लागार दिनकर तिडके, कनिष्ठ विधी अधिकारी नितल हासे, अंजली चौगुले व इम्रान शेख यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0