टाॅयलेटमध्ये माेबाइलचा वापर करणे घातक ठरते

18 Sep 2025 16:39:29
 
 


toilet
 
आता सकाळचे रुटीन अनेकांना खूपच परिचित झाले आहे - झाेपेतून उठणे, फाेन तपासणे, काॅफी किंवा चहा घेणे, टाॅयलेटला जाणे आणि तिथे बसून माेबाइलवर स्क्राेल करणे. ही प्रक्रिया एवढी सामान्य झाली आहे, की यावर मीम्स तयार हाेतात, ज्यात तरुण लाेक माेबाइल घेऊन टाॅयलेटमध्ये जातात आणि जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते दाढी वाढलेले वृद्ध व्यक्ती झालेले असतात.राहुल (वय 26 वर्षे, साॅफ्टवेअर इंजिनीअर) सांगताे की, ‘त्याच्यासाठी टाॅयलेट म्हणजे ‘चिंतन’ करण्याचे ठिकाण झाले हाेते. ताे माेबाइलवर साेशल मीडिया स्क्राेल करणे, ई मेल तपासणे, मीम्स पाहणे, मालिकांचे एपिसाेड बघणे अशा गाेष्टी करत, टाॅयलेटमध्ये 30-40 मिनिटे घालवत असे.’ ही सवय राहुलला लवकरच त्रासदायक ठरली.सुरुवातीला शाैचास हाेताना लहानसहान वेदना हाेत असत, परंतु त्रास वाढल्यावर डाॅक्टरांकडे जावे लागले आणि मूळव्याधीचा विकार झाल्याचे समजले.‘राहुलसारखे हजाराे लाेक या समस्यांना सामाेरे जात आहेत. पाश्चिमात्य पद्धतीच्या टाॅयलेटवर (कमाेड) जास्त वेळ बसल्याने गुदाशयातील स्नायूंवर दाब पडताे, रक्तप्रवाहावर परिणाम हाेताे आणि गुदाशयातील रक्तवाहिन्यांना सूज येते.
 
यामुळे मूळव्याध, क्राॅनिक इन्फ्लमेशनसारख्या (दाह हाेणे) समस्या हाेतात,’ डाॅ. अश्विन पाेरवाल सांगतात.डाॅ. पाेरवाल यांनी 2013 ते 2023 या 10 वर्षांतल्या 14,500 रुग्णांची माहिती जमा केली.त्यापैकी, 90% रुग्ण कमाेडवर बसले असताना माेबाइल पाहत असल्याचे कबूल झाले. 27% रुग्ण टाॅयलेटमध्ये 10 मिनिटांहून अधिक वेळ माेबाइलवर घालवत हाेते. त्यातल्या 1,535 रुग्णांना दीर्घकालीन बद्धकाेष्ठता (काॅन्स्टिपेशन) किंवा मूळव्याधीचा त्रास हाेत हाेता व 1,250 रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज हाेती.‘तरुण पिढीकरिता टाॅयलेट हा माेबाइल वापरण्याचा, साेशल मीडिया पाहण्याचा, गेम खेळण्याचा स्वतःसाठीचा वेळ (मी-टाईम) झालेला आहे. हे ठिकाण त्यांना असे एकमेव वाटते, जिथे ते एकटे असतात, कुणी व्यत्यय आणत नाही. या सवयीने तात्पुरता आनंद मिळाला तरी ही सवय आराेग्यासाठी घातक आहे,’ डाॅ. भारती घाेषाल (मानसशास्त्र तज्ज्ञ) सांगतात.
 
आंतरराष्ट्रीय संशाेधन : टाॅयलेटमध्ये माेबाइलवर वेळ घालवणे, ही सवय केवळ भारतातच नाही तर जगभर आह. स्पेनमध्ये 80% नागरिक टाॅयलेटमध्ये माेबाइलवर स्क्राेलिंग करतात. कॅनडामध्ये 2009 पासून ‘टाॅयलेट स्क्राेलिंग’ आणि ‘माेबाइल गेम’च समस्या नाेंदली आहे. अमेरिकेतील नागरिक हा वेळ चॅटिंग करण्यासाठी, काॅल करण्यासाठी वापरतात. फ्रान्सचे नागरिक ताे वेळ माेबाइलचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी वापरतात. जगभरात मूळव्याध आणि बद्धकाेष्ठता आजारांत वाढ झाली आहे.टाॅयलेटमध्ये किती वेळ याेग्य? ‘टाॅयलेटमध्ये, स्मार्ट फाेनशिवाय सरासरी 7 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे टाळावे. फाेनचा वापर केल्यास हा वेळ 22 मिनिटांच्या पुढे कितीही लागताे. डाॅक्टरांचे संशाेधन सांगते, की 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कमाेडवर बसल्याने मूळव्याधीचा धाेका 1.26 पट वाढताे,’ डाॅ. राेहन जहागीरदार सांगतात.
 
भारतीय शैलीचे टाॅयलेट याेग्य : ‘भारतीय पद्धतीने बसल्याने पाेट आणि आतड्यांवर नैसर्गिक दाब येताे आणि शाैच साफ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पाश्चिमात्य पद्धतीत, कमाेडवर रिलॅक्स बसल्याने शाैचाची क्रिया संथ हाेते, ज्यामुळे बद्धकाेष्ठता वाढते.बद्धकाेष्ठता वाढली की जास्त दाब दिल्याने, मूळव्याध आणि गुदाशयातील सूज वाढते. स्मार्टफाेन वापरणाऱ्या किमान 20% लाेकांना मूळव्याध, गुदफिशर किंवा बद्धकाेष्ठतेचा त्रास हाेताे,’ डाॅ. उदय घाेषाल सांगतात.
 
अस्वच्छतेचाही धाेका : टाॅयलेट सीटवर (कमाेड) बसून हाताच्या बाेटांनी माेबाइल-स्क्रीनवर स्क्राेल करणे, हा अस्वच्छतेचाही प्रकार आहे. सहा फाेनच्या गटामागे एका फाेनवर विष्ठेचे कण तशाच अवषेत दिसून आले. फ्लश केल्यावर पाण्याचे सूक्ष्म थेंब हवेत पसरतात आणि सीट, झाकण, फ्लश हँडल, मजला व आसपासच्या पृष्ठभागांवर बसतात. या थेंबांमध्ये जंतू असू शकतात, जे डायरिया, पाेटदुखी, उलट्या आणि इतर समस्या निर्माण करू शकतात, असे सर्वेक्षण सांगते.माझा मुलगा पाैगंडावस्थेत असून, आम्ही त्याला स्मार्टफाेन घेऊन दिला. आता ताे फाेन घेऊन इतका वेळ टाॅयलेटमध्ये असताे, की आम्हाला त्याची चिंता वाटू लागली,’ रिना (बंगळुरू) सांगते.‘आपण आता टाॅयलेटकडे त्याच्या गरजेच्या दृष्टीने पाहायला हवे. एकांतात माेबाइलवर वेळ घालवण्याचे ते विश्रांतीगृह असू शकत नाही,’ डाॅ. अश्विन पाेरवाल सांगतात.
Powered By Sangraha 9.0