नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडकाेने कार्यवाही करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत आयाेजित बैठकीत शेलार बाेलत हाेते.यावेळी आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डाॅ. किरण कुलकर्णी, नवी मुंबई महापालिकेचे आयु्नत डाॅ. कैलास शिंदे, सिडकाे आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित हाेते. राज्याला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या सांस्कृतिक वारशाची माहिती सर्वत्र पाेहाेचवण्यासाठी नियाेजन करावे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जगभरातील पर्यटक येतील. त्यावेळी राज्याच्या संस्कृतीची माहिती हाेण्यासाठी अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत निधीचा प्रस्ताव तयार करावा. सिडकाेने निधी मागणीच्या प्रस्तावास मान्यता घेऊन या कामाला गती द्यावी. सर्व यंत्रणांनी व विभागांनी शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याच्या अनुषंगाने विविध परवाने त्वरित प्राप्त करून घ्याव्येत, असे निर्देशही शेलार यांनी दिले.