ओशाे - गीता-दर्शन

18 Sep 2025 16:43:52
 
 

Osho
जर आपण मालक असलाे तर सर्वच इंद्रिये आपली मित्र हाेऊन जातात. पण आपण मालक नसलाे, तर तीच सर्व इंद्रिये शत्रू हाेऊन जातात. आपण मालकीची घाेषणाच करीत नाही कधी, अन् कधी चुकून केलीच तर ती घाेषणा अशी असते जसं मी ऐकलं आहे - मी ऐकलंय, एक माणूस हाेता दब्बू, घाबरट.बायकाेला अतिशय घाबरणारा, बहुतेक सगळे पुरुष जसे असतात तसाच हा. रस्त्यावरून येताजाता माेठ्या ऐटीत असायचा. पण घरात बायकाेला फार भ्यायचा-जसे सगळेच पुरुष भितात, तसाच. कधी कधी कुणी अपवाद असताे, नाही असे नाही, पण ताे अपवाद बाजूला ठेवूया..घराबाहेर दिवसभर दमलेला माणूस जेव्हा घरी येताे, तेव्हा त्याला आता भांडाभांडी नकाे असते, कसंबसं गुपचूप रहावं ते बरं. पत्नीचे तसे नसते, ती काही दिवसभर भांडलेली नसते.
सगळ्या तयारीनिशी ती वाट पहाते आहे केव्हा लढाई सुरू करायची? कुरुक्षेत्रातून थकला भागला माणूस. आता त्याला आणखी एका कुरुक्षेत्रात सामना करायची इच्छा नसते. त्या दब्बू नवऱ्यावर पहिल्याच दिवशी तिनं कब्जा केला हाेता, माेठ्या अडचणीत टाकलं हाेतं, अन् ती इतर बायकांसमाेर या गाेष्टीची उघड उघड चर्चा करीत असे.एके दिवशी इतर बायका म्हणाल्या, ‘काहीतरीच! नवरे बायकांना भिऊन असतात. हे माहीत आहे, पण तुम्ही जेवढं सांगताय की ते तुम्हाला घाबरतात, ते आम्ही मान्य करू शकत नाही.’ ती म्हणाली, ‘थांबा, मी तुम्हाला दाखवतेच ना आज. आज दुपारी तुम्ही आमच्या घरी या. नाही तरी आज त्यांना सुट्टीच आहे, ते घरी असणारच. तुम्ही याच सगळ्याजणी म्हणजे मग मी दाखवीन.’ गल्लीतल्या पंधरावीस जणी तिच्या घरी गाेळा झाल्या. सगळ्याजणी आल्यावर तिने नवऱ्याला सांगितले, ‘उठा आणि पलंगाखाली जा बघू.’ ताे बिचारा पटकन उठला अन् पलंगाखाली सरकला.
 
Powered By Sangraha 9.0