कपूर खानदानाला हिंदी सिनेमाची फर्स्ट फॅमिली म्हणतात. पृथ्वीराज कपूर यांनी जवळपास 100 वर्षांपूर्वी हिंदी सिनेमात पदार्पण केलं, ते माेठे स्टार बनले. त्यांचा मुलगा राज कपूर हा युगप्रवर्तक दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता बनला.शाेमॅन असा लाैकिक त्याने प्रस्थापित केला.शम्मी आणि शशी ही त्याची भावंडंही यशस्वी झाली. शम्मीच्या मुलांना सिनेमात यश मिळालं नाही. शशीच्या मुलांनी पृथ्वी थिएटर्सचा नाटकांचा वारसा सांभाळला. राजच्या मुलांपैकी ऋषी कपूर सर्वात गुणवान, सर्वात यशस्वी. रणधीर काही काळ चालला. राजीवला यश मिळालं नाही. ऋषी आणि रणधीर यांच्या मुलामुलींनी सिनेमात कपूर खानदानाचा वारसा यशस्वीपणे चालवला आहे. इथे या खानदानातली चार भावंडं एकत्र दिसतायत.
ऋषी, रणधीर, राजीव आणि बहीण रीमा कपूर जैन या सगळ्या भावंडांची चेहरेपट्टी पाहा. सगळे किती एकमेकांसारखे दिसतात त्यातल्या त्यात ऋषीचाच थाेडासा अपवाद, त्याचा चेहरा उभट नव्हता. रणधीर आणि रीमा हे तर जुळेच दिसतायत. राजीवही तिकडेच झुकलेला दिसताेय बराचसा. एका छापातून काढल्यासारखे सगळे लालगाेरे आणि सगळ्यांचे डाेळे घारे किंवा निळसर छटेचे.म्हणून तर हा फाेटाे पाहिल्यावर काेणा मीमकर्त्याला आठवण झाली ती आयफाेनच्या वेगवेगळ्या माॅडेल्सची. तिथेही छाेटे छाेटे बदल असतात, बाकी बरंचसं हार्डवेअर साॅफ्टवेअर सेमच असतं.