तुमचे सतत घटते वजन हा एखादा आजार तर नाही?

    18-Sep-2025
Total Views |
 
 

Health 
केस गळणे : पाैष्टिक घटकांअभावी वेगाने केस गळू लागतात.तसे केस गळण्याचे मुख्य कारण आहे शरीरात फाेलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी12 ची कमतरता. कमी जेवणामुळे शरीरात हे घटक कमी हाेतात. केस गळू लागतात. केस गळल्यामुळे व्यक्तीत आत्मविश्वासाची कमतरता व निराशा उत्पन्न हाेते.
 
डाेकेदुखी व मायग्रेन : नाेरे्निसयाने त्रस्त लाेकांमध्ये डाेकेदुखी वाढते.विशेषज्ञांच्या मते शरीरात कॅल्शियमच्या अभावामुळे डाेकेदुखी व मायग्रेनचा धाेका वाढताे. कमी जेवण घेणाऱ्या लाेकांच्या मेंदूला पुरेशी ऊर्जा मिळू शकत नाही. जे डाेकेदुखीचे कारण हाेते.अपुरी झाेप : जर खूप जास्त वा खूप कमी झाेप येत असेल तर काही गडबड अवश्य आहे असे समजा. अनियमित जेवण व्यक्तीला एकप्रकारे कुपाेषणाची शिकार बनवते.
 
कमी जेवणाचा परिणाम आहे न्यूराे- बायाेलाॅजिकल सिस्टीममध्ये हार्माे नसंबंधित असंतुलन हाेणे. हे असंतुलन झाेपेवर परिणाम करते. यामुळे व्यक्ती एकतर खूप जास्त झाेपते वा अत्यंत कमी. अनियमित झाेप अनेक प्रकारच्या आजारांना जन्म देते.
 
अखेर का वाटते खाण्याची भीती : एनाेरे्निसयाने पीडित लाेकांच्या मनात स्थूलतेबाबत फाेबिया निर्माण हाेताे. त्यांना वजन वाढण्याची एवढी जास्त चिंता राहते की, ते इतरांसाेबत खाण्यास घाबरू लागतात. जर ते अशक्त असतल तरी त्यांना वाटते की ते स्थूल आहे. यासाठी ते खाण्याबाबत टाळाटाळ करू लागतात. त्यांच्या डाे्नयांमध्ये सतत हेच चालत राहते की, वजन कसे कमी करता येईल.
 
उशीर करू नये : जर आपल्याला स्वत:त वा एखाद्या जवळच्या व्यक्तीत अशी लक्षणे दिसून आली तर त्वरित सावध व्हा.
स्थूलतेबाबत उत्पन्न हाेणाऱ्या फाेबियापासून वाचण्याचा साेपा उपाय आहे याेग्य सल्ला. जर आपण स्वत: या समस्येने पीडित असाल तर पुरेसे जेवण आराेग्यासाठी खूप गरजेचे आहे. जर शरीर सुदृढ असेल तर आपण सुंदर व स्मार्ट दिसाल.