देशात आराेग्याला पूरक वेलनेस सप्लीमेंटच्या बाजारपेठेत मानसिक आराेग्याच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ हाेत आहे. बहुसंख्य ब्रँड्स कॅफीनवर आधारित गाेळ्या, तणाव कमी करण्यासाठीचे तेल, ऊर्जा वाढवण्यासाठी मशरूम गाेळ्या आणि स्नायूंच्या दुखण्यावर जेल विकण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र, गेल्या काही वर्षांत उत्पादन आणि विक्रीच्या नियमांमध्ये स्पष्टता आल्यामुळे गांजावर आधारित औषधांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्केट्स अँड डेटा या संशाेधन कंपनीनुसार, देशाची गांजावर आधारित उत्पादने 2032 पर्यंत 4.14 अब्ज रुपयांपर्यंत पाेहाेचण्याची शक्यता आहे, जी वाढ वर्षाला 17.34% आहे.आयुर्वेदिक डाॅक्टर अनेक वर्षांपासून विशिष्ट आजारांवर उपचार करण्यासाठी गांजायुक्त औषधे वापरत आहेत. परंतु, आता थेट ग्राहकांपर्यंत पाेहाेचणाऱ्या कंपन्या आकर्षक पॅकेजिंगमध्ये गाेळ्या, तेल आणि औषधे विकत आहेत. या औषधांमुळे तणाव कमी हाेण्याचा आणि लक्ष एकाग्र करण्याचा दावा केला जात आहे. परंतु ग्राहक सुरक्षा व ठरवलेल्या नियामक धाेरणांच्या पालनाबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
वाढती मागणी : आयुर्वेदिक औषधांमध्ये गांजाचा वापर करणे कायदेशीर आहे, कारण ते औषधांच्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन करतात.मात्र, नाेव्हेंबर 2014पासून, गांजापासून बनवलेल्या औषधांवर आयुष मंत्रालय (आयुर्वेद, याेग, युनानी, सिद्ध आणि हाेमिओपॅथी) देखरेख ठेवत आहे.गांजायुक्त उत्पादने विकण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी ब्रँड्सना आधी केंद्र सरकारचापरवाना आणि नंतर संबंधित राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.मात्र, याआधी नियमांमध्ये स्पष्टता नसल्याने उद्याेगाला त्रास हाेत हाेता.सन 2023 पासून, अनेक ब्रँड्स या उद्याेगात आल्यामुळे आयुष मंत्रालयाने या उत्पादनांची निर्मिती, विपणन (मार्केटिंग) आणि विक्रीबद्दलचे नियम स्पष्ट करण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत.
‘आता नियमांमधील स्पष्टतेमुळे, गांजायुक्त उत्पादने आणि पूरक औषधे विकणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत आहे.ग्राहक ही उत्पादने वापरत असल्यामुळे आणि परिणाम दिसल्यावर पुन्हा खरेदी करत असल्यामुळे, आम्हाला अधिक ब्रँड्स या बाजारात येण्याची अपेक्षा आहे,’ रेनू बिश्त (काॅमर्सिफाय 360, संस्थापक) म्हणाल्या.मुंबईची बाॅम्बे हेंप कंपनी देशातील पहिल्या वैद्यकीय गांजा निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे.‘आमच्या 45% पेक्षा जास्त ग्राहक पुन्हा खरेदी करणारे आहेत, याचा अर्थ जवळजवळ प्रत्येक दाेनपैकी एक व्यक्ती पुन्हा खरेदीसाठी येत आहे.आराेग्य व निराेगीपणा (वेलनेस) उद्याेगात व्यवसाय करताना हे एक सकारात्मक लक्षण आहे,’ असे यश काेटक (बाेहेकाे, सहसंस्थापक) म्हणाले.