आत्मविश्वास वाढवणारी फॅशन हवी

18 Sep 2025 16:25:42
 

fashion 
 
असे म्हणतात की, बाेलण्यापूर्वी आपले कपडे व बूट आपल्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगून टाकत असतात. यासाठी कपड्यांची निवड नेहमी विचारपूर्वक करायला हवी. ए्नसपर्टही सांगतात की, आपला आत्मविश्वास वाढवण्यात व मूड चांगला करण्यात आपल्या कपड्यांचा खूप माेठा वाटा असताे. भले एखाद्या इंटरव्ह्यूला जात असाल वा एखाद्या पार्टीत भाग घेत असाल तर जर आत्मविश्वास नसेल तर महागडा ड्रेसही फिका पडू शकताे.पाॅवर ड्रेसिंगचा फार्मुला गर्दीत इतरांपेक्षा वेगळे दिसणे आणि बाॅस लेडीचा प्रभाव टाकणे या दाेन्ही वेगवेगळ्या गाेष्टी आहेत. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी काही अतरंगी स्टाइलचाा ड्रेसही घालू शकता. पण पाॅवर ड्रेसिंग आपला आत्मविश्वास वाढवते. याचा अर्थ हा आहे की, आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी ट्रेंड्सनुसार चालायला हवे असे नाही. त्याऐवजी आपण काेणत्या प्रकारच्या कपड्यात जास्त चांगल्या दिसता हे पाहायला हवे. काही छाेट्या छाेट्या गाेष्टींकडे लक्ष देऊन आपण आपली परफे्नट स्टाइल आरामात शाेधू शकता.
 
जे उजळेल आपले साैंदर्य : आपल्याला आपल्या रुपाच्या खुब्या माहीत असतात. काेणाची उंची तिचे ैशिष्ट्य असते तर काेणाचा गाेल चेहरा आकर्षक वाटताे. याप्रमाणे प्रत्येक कटचा ड्रेस सर्वच महिलांवर शाेभून दिसत नसताे. त्यामुळे आपल्या ड्रेसिंग सेन्सचा याेग्य वापर करून असा पाेशाख निवडावा जाे आपले साैंदर्य उजळेल. जर आपण उंच असून पाय सुडाैल असतील तर टाइट फिट जीन्स, शाॅर्ट्स वा हाय स्लिट स्कर्ट व कुर्ती सुंदर दिसेल. तसेच सुडाैल हात कट स्लीव्हज टाॅप वा कुर्त्यात अत्यंत आकर्षक दिसतात.कमी उंचीच्या युवतींसाठी माेनाेक्राेम कलरमध्ये मॅ्नसी ड्रेस, रिलॅ्नस फिट जीन्स वा उत्तम फिटिंगचा सूट त्यांचे साैंदर्य उजळण्यासाेबत आत्मविश्वासही वाढवू शकताे.
 
आपला कलर टाेन समजून घ्या : आपल्या स्किन टाेनच्या विरुद्ध रंग आपला महागडा ड्रेस व शानदार अ‍ॅ्नसेसरीज फिके बनवू शकताे. यासाठी आपल्या रंगानुसारच रंग निवडा. उदा. गडद रंगाच्या त्वचेवर ब्राउन, ब्रिक रेड वा कॅरेमल अशा वार्म शेड्स चांगल्या वाटतात. तेच गाेऱ्या रंगावर पिंक, पिच, स्काय ब्ल्यू, लाल असे रंग छान वाटतात.गव्हाळ रंगावर सारे रंग शाेभतात.
 
कसा असावा प्रिंट : स्टाइलच्या नावाखाली काेणताही प्रिंट निवडणे याेग्य नव्हे. प्रिंट निवडताना ड्रेसची स्टाइल, प्रसंग व वातावरण लक्षात ठेवायला हवे. उद. कार्टून प्रिंअ नाइट सूटवर तर चांगला दिसताे पण त्या प्रिंटचा सलवरर सूट अत्यंत विचित्र व खराब वाटेल. असेच कमी उंचीवर माेठमाेठे फ्लाेरल प्रिंट उंची आणखी कमी दर्शवू शकतात. समान नियमच स्ट्राइप्सवरही लागू हाेताे. उंच महिलांना आडव्या रेषांचे कपडे जास्त सूट करतात तर जाड शरीराच्या महिलांना सरळ रेषांचे ड्रेस निवडायला हवेत. यामुळे आपण उंच दिसाल.
Powered By Sangraha 9.0