इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाइन माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर शास्त्राचे धडे देणे विद्यापीठ अनुदान आयाेगाने (यूजीसी) बंधनकारक केले आहे.त्यानुसार सर्व विद्यापिठे व महाविद्यालयांना नव्या शैक्षणिक वर्षात दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे देण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी आयाेगाकडून विशेष माहिती पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली आहे.स्मार्टफाेन, लॅपटाॅप, समाज माध्यमे या सध्याच्या तरुणांसाठी आवश्यक बाबी ठरल्या आहेत; पण या डिजिटल माध्यमांच्या अतिवापराबराेबरच हॅकिंग, फसवणूक, डेटा चाेरी असे सायबर गुन्हेही वाढत आहेत.
गृहविषयक संसदीय स्थायी समितीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात याच धाेक्यांची नाेंद करून उच्च शिक्षण संस्थांमध्ये सायबर शिक्षणाचा आग्रह धरला हाेता.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच ऑनलाइन शिस्त अंगीकारली, तर भविष्यात वैय्नितक आणि व्यावसायिक आयुष्यातील संकटे टाळता येतील. त्यासाठी सायबर सुरक्षित कॅम्पस निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे यूजीसीने स्पष्ट केले.आयाेगाने उच्चशिक्षण संस्थांसाठी निराेगी सायबर वातावरणाची माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या माहिती पुस्तिकेत डिजिटल सेफ्टी, डेटा प्रायव्हसी, जबाबदार ऑनलाइन वर्तन आणि सायबरजागरूकतेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांशिवाय इतर सर्व अभ्यासक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे प्राथमिक धडे देण्याचे आयाेगाकडून अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रत्येक शिक्षण संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि समाज माध्यमांवर या पुस्तिकेचा प्रचार केला जाईल; तसेच दीक्षांत समारंभावेळी नव्याने दाखल हाेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सायबर सुरक्षा सत्र घेण्याचे आदेशही यूजीसीने दिले आहेत.विद्यार्थ्यांबराेबरच शिक्षक व बिगरशिक्षक कर्मचाऱ्यांनी हे वाचून प्रत्यक्ष वापरात आणावे, अशा सूचना आयाेगाने दिल्या आहेत. त्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना ही माहिती पुस्तिका ई-मेलद्वारे पाेहाेचवण्यात येणार आहे. नव्या पिढीच्या डिजिटल हॅबिट्समध्ये सुरक्षिततेचा धागा गुंफण्यासाठी यूजीसीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आह