श्राद्ध पक्षात जेवणाच्या टेबलावर गायींना आहार देण्यात आला

18 Sep 2025 16:37:39
 
 

cow 
सध्या श्राद्ध पक्ष सुरू आहे. त्यामुळे, बुधवारी (10 सप्टेंबर) वडाेदरा जवळील मियागम कर्जन येथील पांजरपाेळ्यात जेवणाच्या टेबलावर गायींना आहार देण्यात आला. पारंपरिक पद्धतीने सुमारे 500 गायींसाठी राेटी, भाज्या, डाळी, मिठाई आणि फळे ठेवून आहार देण्यात आला. या उपक्रमासाठी श्रावण सेवा फाउंडेशनने पाच स्वयंपाकींना बाेलावून गायींसाठी स्वयंपाक केला. यामध्ये 2000 राेटी, 500 किलाेपेक्षा जास्त भाज्या आणि 500 किलाे फडा लापशी तयार करून श्राद्ध पक्षानिमित्त गायींना वाढण्यात आले.
‘श्रावण सेवा फाउंडेशन’चे नीरव ठक्कर यांनी सांगितले की, लाेक त्यांच्या नातेवाइकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या श्राद्ध पक्षात धार्मिक श्राद्ध विधी करतात.बरेच लाेक सेवा आणि दानधर्म करतात आणि बरेच लाेक त्यांच्या नातेवाइकांच्या पश्चात लाेकांना जेवू घालतात.
 
आमच्या संस्थेला वाटले, की श्राद्ध पक्षाच्या दरम्यान गायींसाठी जेवण आयाेजित करणे आणि त्यांनाही जेवू घालणे शक्य आहे.हे ठरल्यानंतर आम्ही मियागाम कर्जन येथील पांजरापाेळमध्ये गायींना आहार देण्याची याेजना आखली. यासाठी एक आठवडा आधी तयारी केली. सुमारे 500 गायींना ताजे जेवण देण्यासाठी पाच आचाऱ्यांना बाेलावण्यात आले आणि त्यांनी सर्व जेवण शिजवले. बुधवारी (10 सप्टेंबर) गायींसाठी जेवणाचे आयाेजन करण्यात आले हाेते, ज्यामध्ये 2000 राेटी, 500 किलाेपेक्षा जास्त मिश्र भाज्या, डाळींमध्ये हरभरा डाळ, 500 किलाेपेक्षा जास्त फडा लापशी आणि टरबूज गायींना देण्यात आले. गायींना हे सर्व व्यवस्थित खाता यावे यासाठी एक प्लॅटफाॅर्म म्हणजेच टेबल लावण्यात आले. यावर प्लेट्स ठेवून त्यात भात आणि इतर अन्नपदार्थ वाढण्यात आले आणि यानंतर गायींना तेथे आणून त्यांना हा आहार देण्यात आला. प्लॅटफाॅर्मच्या दाेन्ही बाजूला अगदी रांगेत गायींनी व्यवस्थित हा आहार घेतला.
 
Powered By Sangraha 9.0