काेराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प उभारणार

18 Sep 2025 16:13:42
 

CM 
 
नागपूर महानगर क्षेत्रातील काेराडीत (ता. कामठी) पर्यावरणीय पर्यटन स्थळ (इकाे टुरिझम) विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये (महाजेनकाे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी महाजेनकाेची 232.64 हे. आर. जागा एनएमआरडीएला 30 वर्षांच्या भाडेकरारावर प्रतिवर्ष 1 रुपयाप्रमाणे भाडेपट्ट्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहे.
 
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महाजेनकाेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, एनएमआरडीएचे महानगर आयु्नत संजय मीणा आदी उपस्थित हाेतमहाजेनकाेने भाडेकराराने दिलेली जागा काेराडी, महादुला, खापरखेडा, नांदा (ता. कामठी) आणि घाेगली (ता.नागपू ग्रामीण) या भागात आहे.
 
ही जमीन नैसर्गिक संसाधनांच्या सान्निध्यात असून, जागतिक दर्जाचे पर्यावरणीय पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी उपयु्नत आहे.
या उपक्रमाचा मुख्य आधार शाश्वत जलकेंद्रित विविध कार्यक्रम आहे.नाॅन-माेटरायइड बाेटिंग, पर्यावरणपूरक शिकारा आणि फ्लाेटिंग डेक राइड्स, फ्लाेटिंग प्लॅटफाॅर्मवरून पक्ष्यांचे निरीक्षण, निसग पर्यटन आदी उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0