अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 2091 काेटी रुपये निधी

    18-Sep-2025
Total Views |
 
 

Beed 
 
बीड जिल्ह्याच्या विकासात गेमचेंजर ठरणाऱ्या अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्राॅडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने 2091 काेटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात नव्याने 150 काेटींची भर घालून हा निधी वितरित करण्यात आला आहे.यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून, बीडकरांना पालक मंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मु्नती संग्राम दिनाची अनाेखी भेट दिली आहे.बीड जिल्ह्याचे पालक मंत्रिपद स्वीकारल्यापासून पवार यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते विकासाला चालना देण्यासाठी विविध बैठका घेऊन त्यांनी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधलाआहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्राॅडगेज प्रकल्पाला गती मिळाली आहे.हा रेल्वे मार्ग बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्याेजक, व्यापारी आणि नागरिकांसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल.राेजगारनिर्मिती हाेईल आणि वाहतूक सुलभ हाेईल, असा विश्वास पवार यांनी व्य्नत केला आहे.