मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल टी-2 वर नातेवाइकांना आणण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांना 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ थांबले तरी 150 रुपये (जनरल पार्किंग) ते 250 रुपये (प्रीमियम पार्किंग) शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या नातेवाइकांनी संताप व्य्नत केला आहे.अनेकांनी सांगितले की, 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ थांबूनही एवढी माेठी र्नकम द्यावी लागते, तर काहींनी 8 ते 24 तासांसाठी 1000 रुपयांचा भलामाेठा पार्किंगचा खर्च असल्याचेही सांगितले.‘अहमदाबाद विमानतळ याच ऑपरेटरकडून चालवले जाते. तेथे खासगी वाहनांसाठी 10 ते 12 मिनिटांची माेफत पिक-अपची साेय आहे. मग मुंबईतच ही साेय का नाही,’ असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
प्रवाशांनी सांगितले की, ‘मुंबइविमानतळावरील गर्दी, सुरक्षा तपासणी आणि वाहतूक काेंडीमुळे आधीच त्रास आहे. अशावेळी पार्किंगसाठी जबरदस्तीने पैसे माेजावे लागणे अन्यायकारक आहे.प्रवाशांना घेण्यासाठी गाड्यांना वेगळा मार्ग ठेवला जाऊ शकताे; पण प्रत्यक्षात सर्वांना पेड पार्किंग झाेनमध्येच जावे लागते.’ अनेकांनी स्पष्ट केले की, पार्किंगसाठी घेतले जाणारे शुल्क जास्त असून, व्यवस्थापनातील चुकीच्या पद्धतींमुळे ुप्पट पार्किंग आणि गर्दी हाेते. एक्सप्रेस महामार्गावरील टॅक्सी, ऑटाे किंवा खासगी गाड्यांना थेट पेड झाेनमध्येच प्रवेश करावा लागताे. त्यामुळे गाेंधळ आणि प्रवाशांचा वेळ दाेन्ही वाया जाताे.पुरुषाेत्तम जगवानी आपल्या भावाला घेण्यासाठी टी-2वर आले हाेते, ‘आपण काही करू शकत नाही, व्यवस्थापनच नियम करते.
एकट्याने तक्रार केली तरी काही बदलणार नाही. आपण एकटेच तक्रार करताे, पैसे देताे, थांबताे आणि नातेवाईक येतात तसे त्यांना घेऊन निघताे.’ प्रवासी करण जाधव यांनी सांगितले, ‘मी आता स्वतः गाडी घेऊन विमानतळावर जात नाही किंवा कुटुंबीयांनाही येऊ देत नाही. ठाण्यातून एवढेसे अंतर असल्याने फ्नत काही मिनिटांसाठी इथे येण्यात काही अर्थ नाही, विशेषतः एवढे जास्त शुल्क माेजून.’ विमानतळाच्या व्यवस्थापनाकडे या संदर्भात चाैकशी केली असता ठाेस उत्तर मिळाले नाही. केवळ पार्किंग शुल्क वगळता पिक-अपसाठी माेफत साेय देणे सध्या शक्य नाही, इतकेच सांगण्यात आले. प्रवाशांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असूनही प्रवाशांच्या नातेवाइकांना उगाचच जास्त पैसे माेजावे लागतात, हे गैरसाेयीचे आणि अन्यायकारक आहे.