पुणे, 16 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्यासाठी फक्त दोन आठवडे राहिले आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्यासाठी मुदत आहे. मुंबई सार्वजनिक वेिशस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे प्रकरण पाच अंतर्गत कलम- 31 अ ते 34 नुसार व त्याअंतर्गत नियम सतरा ते एकवीस प्रमाणे दरवर्षी सनदी लेखापालांकडून आर्थिक वर्ष संपल्यापासून सहा महिन्यांच्या आत लेखा परीक्षण करून घ्यावे लागते. संपूर्ण ऑडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टलवर ऑनलाइन सादर करावा लागतो. त्यानंतर धर्मादाय विभागाच्या वेबसाइटवर 30 सप्टेंबरपूर्वी हा संपूर्ण ऑडिट रिपोर्ट अपलोड करावा लागतो.
लेखा परीक्षण अहवाल अपलोड झाल्यावर त्याची ऑनलाइन पोहोच (अँकनॉलेजमेंट) प्राप्त होते. या ऑनलाइन पोहोचवर तीन वेिशस्तांच्या आणि सनदी लेखापालांच्या नाव आणि सहीसह लेखा परीक्षण अहवालाचा संच जिल्ह्यातील न्यास नोंदणी कार्यालयाच्या लेखा (अकाउंट) शाखेत जमा करून पोहोच घेणे आवश्यक असते.
धर्मादाय संस्थांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या किती टक्केअंशदान आकारण्यात यावे, याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच काही याचिकांचे निर्णय देताना राज्य शासनाला दिले आहेत. शासनाचा निर्णय झाल्यावर न्यासावर अचानक आर्थिक दायित्व येऊ नये म्हणून यापूर्वीप्रमाणे किमान दोन टक्के इतक्या अंशदान रकमेची तरतूद लेखा परीक्षण अहवालामध्ये करावी.
-ॲड. शिवराज कदम जहागिरदार (माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे)