जेव्हा आपण ऑिफसमध्ये काम करत असताे तेव्हा लवकर जाऊन काेट खुर्चीला टांगून लगेच कॅेटेरियात जाऊन चहाबराेबर टाईमपास/गाॅसिपिंग करता येते.लंचब्रेक झाला की वेळेत जेवण हाेते. पुन्हा कामे वेळेत आणि लवकर हाेतात कारण घराच्या तुलनेत ऑिफसमध्ये लक्ष विचलित हाेत नाही. ऑिफसमध्ये कामाचे वातावरण असते आणि आपण काय करताे आहे हे शेजारी किंवा कुणीतरी पहात असते. काही नाही तरी सीसीटीव्ही आपल्यावर राेखलेले असते. त्यामुळे स्वाभाविकपणे काम हाेत राहते. घरातून काम करायचे म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा प्रचंड स्वयंशिस्त पाळावी लागते. घरात पसारा पडला असला, कामे पडली असली तर ती डाेळ्याआड करून कामाला बसावे लागते. ते जमले नाही तर मग कामाचे ठराविक तास रहात नाहीत.
कामे मिळवण्याचे तंत्र आणि वेळ दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही एका कंपनीत नाेकरी म्हणून घरातून काम करत नसता आणि कामे मिळतील तशी करत असता तेव्हा तुमच्या क्षेत्रातील लाेकांशी संपर्क ठेवावा लागताे. केवळ मेल आणि ाेनवरून संपर्क ठेवून भागत नसते. अधूनमधून प्रत्यक्ष भेटावे लागते. त्यासाठी घरातन बाहेर पडावे लागते. तरच नवीन कामे मिळतात, संधी दिसतात.संधी मिळत नसते. हुडकावी लागते, शाेधावी लागते, खेचून आणावी लागते. चुकून मिळालीच तर त्यासाठी इतर काही कम्फर्टसचा त्याग करायची तयारी असावी लागते. घरातून काम करताना नीट कामे झाले नाही किंवा ठरलेले काम वेळेत पूर्ण झाले नाही4 तर ताण येताेच पण, काही प्रसंगात अपराधी वाटू लागते. मग चिडचिड हाेते. अनेकदा संध्याकाळ कामात जाते पण रात्री उशीरापर्यंत काम करत बसावे लागते.