पैसा माणसाच्या सुखाचे फ्नत एक साधन आहे

    16-Sep-2025
Total Views |
 

Money 
 
आपण विनाकारणच पैशाला खूप माेठे बनवत राहिलाे आहाेत. तेव्हा प्रश्न पडताे की, हा वाईट आहे का? की चांगला आहे? या दाेन्हींपैकी काहीही नाही.हे फक्त एक साधन आहे जे आपण तयार केले आहे.आपण हे समजायला हवे की, काेणताही माणूस पैशामागे धावत नाही. हे ऐकायला विचित्र वाटू शकते पण मी पुन्हा सांगेल की, लाेकांना जे हवे आहे ते पैसा नाही. हाे, पैसा त्या गाेष्टी मिळवण्याचे साधन आहे ज्याला ताे एका उत्तम जीवनासाठी आवश्यक मानताे.प्रत्येक माणसाला वाटत असते की, त्याचे जीवन सुखी असावे. सुख पाच वेगवेगळ्या प्रकारे येत असते.जर आपले शरीर सुखी असेल तर त्याला सुख वा आराम समजले जाते. जर आपले मन सुखी असेलतर आपण त्याला शांती म्हणताे. जर मन खूप जास्त खूश असेल तर त्याला आनंद म्हणताे. जर आपल्या भावना सुखाने भरल्या तर त्याला आपण प्रेम म्हणताे.
 
जर हे सुख खूप जास्त झाले तर आपण त्याला करुणा म्णताे. जर सुख आपल्या जीवन ऊर्जेपर्यंत पाेहाेचले तर त्याला परमानंद म्हणताे. जर आपल्या चहुबाजूंचे वातावरण सुखी हाेत असेल तर त्याला आपण यश म्हणताे. आपल्याला फक्त एवढेच हवे आहे ना? आपण म्हणाल, नाही, मी तर स्वर्गात जाऊ इच्छिताे. आपण स्वर्गात का जाऊ इच्छिता? कारण असा प्रचार केला जात आहे की, ते अत्यंत मनाेहर व सुखद स्थान आहे.खरे तर आपल्याला जे हवे आहे ते आहे सुख आणि आनंद आणि सध्या आपला विश्वास आहे की, या जगात पैसा आपल्यासाठी हे खरेदी करू शकताे. जे एका मर्यादेपर्यंतच खरे आहे.
 
पण पैसा फक्त बाह्यसुख देऊ शकताे. हा आंतरिक सुख आणि आनंद देऊ शकत नाही. जर आपल्याकडे खूप सारा पैसा असेल तर आपण एका फाइव्ह स्टार हाॅटेलात राहू शकता पण जर आपण शरीर, मन, भावना वा ऊर्जेच्या स्तरावर खुश नसाल तर आपण फाइव्ह स्टार हाॅटेलची मजा उपभाेगू शकता का? नाही. पण जर हे चारी सुखी असतील तर आपण एका झाडाच्या सावलीतही मजा उपभाेगू शकता.याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे पैसा नसावा.नाही, अशी गाेष्ट नाही. पण आपल्याला आपली प्राथमिकता समजायला हवी. जर आपल्यात हे चारी आनंदी असतील आणि आपल्याकडे पैसाही असेल तर आपण बाहेरचे वातावरण खूप आनंदी बनवू शकता.धनदाैलतीविषयी काहीही चांगले वा वाईट नसते. हे फक्त एक साधन आहे. फक्त एवढीच गाेष्ट आहे की, जर पैसा आपल्या खिशाऐवजी डाे्नयात घुसला व तिथे त्याने ठाण मांडले तर दु:ख व त्रासच वाट्याला येतील.