आत्मविश्वास व परिश्रमच यशाची शिडी

    15-Sep-2025
Total Views |
 

thoughts 
 
लंडनमध्ये एक डाॅक्टर राहात हाेता.एकदा ताे आजारी पडला. काही महिने आराम करण्यासाठी ताे एका डाेंगरी भागात पाेहाेचला. त्याच दिवसांत त्याच्या मनात कादंबरी लिहिण्याचा विचार आला.त्याने जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा लिहून कित्येक तास ताे एक शब्दही लिहू शकला नाही. तरीही ताे लिहून व खाेडून सुधारत राहिला. या काटछाटीने सारे पान भरून जात असे आणि शेवटी ताे ते ाडून ेकून देत असे. पुन्हा लिहू लागत असे. अशाप्रकारे अनेक महिने गेले, पण त्याने धैर्य न साेडता अखेरीस एक दिवस कादंबरी लिहून पूर्ण केली.त्याने कादंबरीची काही पाने पुन्हा वाचून पाहिली तेव्हा त्याला कादंबरीत काहीच चांगले वाटले नाही. त्याला वाटले त्याचे सारे श्रम वाया गेले. त्याने रागाने कादंबरी कचऱ्याच्या डब्यात टाकली व मन हलके करण्यासाठी ताे जवळच्या गावात ेरफटका मारायला गेला.वाटेत त्याने पाहिले की, एक शेतकरी नापीक असलेल्या जमिनीत खाेदकाम करीत हाेता. डाॅक्टरला राहवले नाही.
 
त्याने शेतकऱ्याला विचारले, ‘दादा, तू या जमिनीवर एवढे श्रम करीत आहे पण ही तर नापीक आहे. ती केव्हाही सुपीक हाेणारच नाही. तरी तू एवढे कष्ट का करताे आहेस?’ शेतकरी म्हणाला, ‘खरं आहे तुमचं म्हणणं. माझे वडीलही असाच विचार करीत असत, पण मी स्वत:ला खाेदकाम करण्यापासून राेखू शकलाे नाही. कारण मला विश्वास आहे की, एक ना एक दिवस ही जमीन मी नक्कीच सुपीक करीन.’ शेतकऱ्याचा आत्मविश्वास पाहून डाॅक्टर विचार करू लागला. ताे मनातल्या मनात म्हणाला, ‘जेव्हा एका अशिक्षित शेतकऱ्यामध्ये एवढा आत्मविश्वास आहे तर मी शिकला सवरलेला असूनही एवढ्या लवकर कशी हार मानू शकताे.’ ताे परत िफरला आणि पुन्हा कादंबरी लिहू लागला. अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर कादंबरी पूर्ण झाली.त्याने त्या कादंबरीचे नाव ठेवले, ‘हॅटर्स कॅसल’. ती छापली जाताच जगभर प्रसिद्ध झाली. ही लिहिणाऱ्या या डाॅक्टरचे नाव हाेते, ए. जे. क्राेनिन. हे नाव जगातील महान कादंबरीकारांमध्ये सामील झाले.